Union Ministers JP Nadda and Jitendra Singh meet Sonam Wangchuk at Medanta Hospital amid ongoing Delhi protests. saam tv
देश विदेश

दिल्ली आंदोलनादरम्यान मोठी घडामोड! रुग्णालयात सोनम वांगचुक यांची 2 केंद्रीय मंत्र्यांसोबत 45 मिनिटे चर्चा; बैठकीत काय घडलं?

Sonam Wangchuk Hospital Meeting With Central Ministers: दिल्लीतील आंदोलनादरम्यान मोठी घडामोड समोर आली आहे. सोनम वांगचुक यांची मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत 45 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत नेमकं काय घडलं, जाणून घ्या सविस्तर.

Omkar Sonawane

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन अजुनही सुरू असून बुधवारी या आंदोलनाचा 32 वा दिवस आहे. विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करत आहे. दरम्यान पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले आहे की, आता ते सरकारशी चर्चा करण्यासाठी जाणार नाहीत, तर सरकारनेच जंतर-मंतरवर येऊन चर्चा करावी.

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री जे.पी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घेतली. सध्या वांगचुक रुग्णालयात दाखल असून दिल्लीतील सुरू असलेला तणाव करण्यासाठी सरकारचे हे मोठे पाऊल मानले जात आहे. सोनम वांगचुक यांचे अजुनही उपोषण सुरू आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी त्यांना सफदजंग रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बैठकीत काय चर्चा झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्र्यांनी मंगळवारी रात्री सुमारे 45 मिनिटे सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा केली. यावेळी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. तसेच त्यांच्या पत्नीचे विधान दाखवत सरकार चर्चेसाठी तयार असताना अडचण काय आहे, असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर वांगचुक यांनी सांगितले की, त्यांना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचाही विचार करावा लागणार आहे.

नीट पेपरफुटीवरून देशभरात वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्ष एकवटला असून जंतर-मंतरवर देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्याठिकाणी भेट देत अभिजीत दीपके यांच्याशी चर्चा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

आमचा वेळ वाया घालवू नका; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार? कृषिमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देत सगळंच सांगितलं

Amravati Tourism: अमरावतीमधील हा किल्ला देतो इतिहासाची साक्ष; एका सुट्टी नक्की फिरून या

SCROLL FOR NEXT