SONAM WANGCHUK JOINS DELHI CJP PROTEST saam tv
देश विदेश

दिल्ली CJP आंदोलनात सोनम वांगचुकांची एन्ट्री; मोदी सरकारला दिला मोठा इशारा

Sonam Wangchuk Warns Of Hunger Strike Over Arrested Leaders: दिल्लीतील CJP आंदोलनात सोनम वांगचुक यांची एन्ट्री झाली आहे. अटक केलेल्या नेत्यांची उद्यापर्यंत सुटका न झाल्यास उपोषण किंवा पदयात्रा सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला.

Omkar Sonawane

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात आता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची एन्ट्री झाली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या CJP आंदोलनादरम्यान नेत्यांना अटक केल्याने त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. भारतात ‘अघोषित आणीबाणी’सदृश परिस्थिती असल्याचा आरोप करत त्यांनी अटक केलेल्या नेत्यांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे. उद्यापर्यंत या नेत्यांची सुटका झाली नाही, तर उपोषण किंवा पदयात्रा सुरू करण्याचा विचार करावा लागेल, असा इशाराही वांगचुक यांनी दिला आहे.

सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत आपली भूमिका मांडली. त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत शांतता आणि एकजूट राखण्याचे आवाहन केले. मात्र, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल, याची कल्पनाही केली नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. वांगचुक म्हणाले, आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक नेते पुढे आले होते. मात्र, आता या सर्व नेत्यांना अटक करण्यात आली. या कारवाईवर त्यांनी प्रश्न उपस्थित करत अटक केलेल्या सर्व नेत्यांची लवकरात लवकर सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

उद्यापर्यंत सुटका न झाल्यास उपोषण किंवा पदयात्रेचा विचार

अटक केलेल्या नेत्यांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर मी स्वतः उपोषणाला बसेल किंवा पदयात्रा काढेल, असे वांगचुक यांनी स्पष्ट केले आहे. NEET पेपरफूटी प्रकरणानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचूक जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले होते. त्यांची प्रकृती देखील खालावली होती. त्यांनी केलेल्या उपोषणामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठे बळ मिळाले होते आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. आता पुन्हा त्यांनी उपोषण आणि पदयात्रेचा इशारा दिल्याने मोदी सरकारचे टेन्शन वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amitabh Bachchan: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश, ४ वर्षांपूर्वीचं प्रकरण काय?

Maharashtrian Cuisine : महाराष्ट्राची चव, अस्सल खमंग आणि झणझणीत खाद्यसंस्कृतीचा वारसा

Maharashtra Hidden Gems : सह्याद्रीच्या कुशीतलं 'ढगांचं गाव'! ऑक्टोबरमध्ये उन्हाच्या कडाक्यात 'येथे' अनुभवाल थंडगार हवा

Maharashtra News Live Update: तुषार गांधी यांची लवकरच सुटका होणार

जामिनावर बाहेर आला अन् महिनाभरात युवकाचा मृत्यू; कारागृहात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT