sonam wangchuk ends hunger strike saam tv
देश विदेश

Sonam Wangchuk Ends Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांनंतर उपोषण मागे, सरकारकडून काय आश्वासन मिळालं?

sonam wangchuk ends hunger strike : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर महत्वाच्या मागण्यांसाठी ते गेल्या २६ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. वांगचुक यांनी उपोषण सोडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Nandkumar Joshi

सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण मागे घेतले. नीट पेपरफुटीप्रकरणी जबाबदारी निश्चित करणे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यांसह इतर मागण्यांसाठी ते मागील २६ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलंय. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

सोनम वांगचुक उपोषण सोडत असताना त्यांच्या पत्नी गीतांजली या देखील उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. यावेळी जेपी नड्डा यांनी वांगचुक यांना एक पत्र वाचून दाखवले. सरकारकडून वांगचुक यांना आश्वासने देण्यात आली आहेत. संसदेवरील मोर्चा आणि जंतरमंतरवरील शांततापूर्ण मोर्चात सहभागी झालेल्या एकाही आंदोलकावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. संसदेत पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी उपाययोजना करण्याच्या मुद्द्यावर चर्चा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच नीट पेपर लीकनंतर आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटु्ंबीयांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याचेही आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी सोनम वांगचुक यांच्यासाठी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोनम वांगचुक यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपला दिनक्रम निश्चित करावा आणि लवकरात लवकर ते बरे व्हावेत, अशी विनंती मी त्यांना करतो. सोनम यांची प्रकृती उत्तम राहो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे मोदींनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, मोदी यांनी रात्री उशिरा एक व्हिडिओ संदेश विद्यार्थ्यांसाठी दिला आहे. पेपर लीक रोखणे आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची तरतूद असलेले विधेयक संसदेत लवकरात लवकर सादर करण्यात येईल. शुक्रवारी या विधेयकाच्या मसुद्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, असेही आश्वासन मोदींनी दिले. संसदेत सादर करण्यात येणारे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश; मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

SCROLL FOR NEXT