Sonam Wangchuk Arrest x
देश विदेश

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Sonam Wangchuk : लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Yash Shirke

Sonam Wangchuk Arrest : राज्याचा दर्जा मिळावा यासाठी सध्या लडाखमध्ये आंदोलन सुरु आहे. यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाचे नेतृत्त्व सोनम वांगचुक करत आहेत. पोलिसांनी सोनम वांगचुक यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी लडाख हिसांचारात ४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सोनम वांगचुक यांना अटक केली आहे. अटकेनंतर तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. वांगचुक यांच्या अटकेचा आंदोलनावर परिणाम होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लेहमध्ये बंद दरम्यान लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलन करणारे आंदोलक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष झाला. या व्यापक संघर्षामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. ४० पोलीस कर्मचाऱ्यांसह ८० जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दोन दिवसांनी म्हणजेच आज (२६ सप्टेंबर) रोजी अटक झाली आहे. ते दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेणार होते. पण त्याआधीच त्यांना अटक झाली.

गुरुवारी (२५ सप्टेंबर) केंद्रीय गृह मंत्रालयाने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख म्हणजेच एसईसीएमओएचा एफसीआरए परवाना तात्काळ रद्द केला होता. लडाखला राज्याचा दर्जा आणि संवैधानिक संरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी वैयक्तिक सुरक्षेची चिंता देखील व्यक्त केली होती.

'मला वाटते की ते (प्रशासन) माझ्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत खटला चालवण्याचा आणि मला दोन वर्षे तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत', असे सोनम वांगचुक म्हणाले होते. 'माझ्यावर कारवाई होणार आहे, यासाठी मी तयार आहे', असेही त्यांनी म्हटले होते. सोनम वांगचुक यांना तुरुंगात ठेवल्याने जास्त समस्या निर्माण होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT