Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : आईला परपुरुषासोबत रंगेहाथ पकडले, संतापलेल्या मुलाने दोघांनाही संपवलं

Hariyana Crime News : हरियाणा सिरसा येथे मुलाने आई आणि तिच्या प्रियकराची गळा दाबून हत्या केली. मृतदेह स्वतःच्या गाडीत भरून तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. या दुहेरी हत्येने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

Alisha Khedekar

  • आई-प्रियकराचे अनैतिक संबंध बघून मुलाचा संताप अनावर

  • मुलाने आई आणि तिच्या प्रियकराची गळा दाबून हत्या केली

  • दोन्ही मृतदेह गाडीत भरून पोलीस ठाण्यात नेले

  • दुहेरी हत्येने सिकंदरपूर परिसरात खळबळ

  • पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला

हरियाणातील सिरसा येथे एका मुलाने त्याच्या आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे मृत महिलेचे अनैतिक संबंध तिच्या मुलाला मान्य नसल्याने तरुणाने आईची आणि तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर तरुणाने दोन्ही मृतदेह पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची घटना घडली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदरपूर जिल्ह्यात, राजकुमार नावाच्या एका तरुणाने गुरुवारी रात्री त्याच्या आईला आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडले. आई आणि तिच्या प्रियकराला बघून तरुणाचा राग अनावर झाला. त्याने घरात घुसून त्यांचा गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्याने दोघांचे मृतदेह त्याच्या गाडीमध्ये भरून थेट पोलिस ठाण्यात गेला.

पोलिस ठाण्यात जाताना पोलिसांनी त्याला अडवलं. तेव्हा त्याने त्यांना सांगितले की, त्याच्या आईचे आणि तिच्या प्रियकराचे मृतदेह गाडीत आहेत. "दोन्ही मृतदेह गाडीतून बाहेर काढा."पोलिसांनी गाडीची झडती घेतली तेव्हा त्यांना आत दोन मृतदेह आढळले. यामुळे पोलिस ठाण्यात गोंधळ उडाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आणि त्या तरुणाला ताब्यात घेतले.

पोलिस चौकशीदरम्यान, तरुण म्हणाला, "माझ्या आईचे त्या माणसावर प्रेम होते. मला अनेक दिवसांपासून हा संशय होता. मी माझ्या आईला यापूर्वी अनेक वेळा समजावून सांगितले होते, पण ती ऐकत नव्हती. गुरुवारी रात्री मी त्यांना रंगेहाथ पकडले आणि नंतर दोघांचीही हत्या केली." या दुहेरी हत्येमुळे सिकंदरपूरमध्ये खळबळ उडाली आहे. डीएसपी राजेश कुमार म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Crime: शिक्षकी पेशाला काळीमा! आश्रमशाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून बलात्कार

शरद पवारांना मोठा धक्का; पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

Skin Care: थंडीत चेहरा काळा पडतोय? घरातला फक्त एक पदार्थ वापरा, चेहरा हिऱ्यासारखा चमकेल, गाल होतील मऊ-मऊ

Maharashtra Live News Update: नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

New Year Special: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या घरी बनवा टेस्टी प्लम केक

SCROLL FOR NEXT