Assam Flood News
Assam Flood News  Saam Tv
देश विदेश

आसाम राज्याला महापुराचा फटका; २० जिल्हे पुराने प्रभावित...(पाहा Video)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: राजधानी दिल्ली, यूपीसह उत्तर भारतात बहुतांश राज्यांतील (states) लोक सध्या कडक उन्हामुळे हैराण झाले आहेत. त्यांना उन्हाचा त्रास होत आहे. आता पाऊस (rain) लवकर येण्याची प्रतीक्षा आहे. पण देशाचा एक भाग असाही आहे, जिथे उष्मा नाही, पूर (Flood) आणि पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात महापुराचा फटका बसला आहे. आसाममध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूर आला आहे. यामुळे भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली आहे.

पाहा व्हिडिओ-

आसामच्या (Assam) २० जिल्ह्यांमध्ये जवळपास २ लाख लोकांना पुराचा मोठा फटका बसला आहे. प्रशासनाच्या (administration) वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिमा हासाओ (Dima Hasao) जिल्ह्यात डोंगराळ प्रदेशात भूस्खलनामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटल्यानं त्याचा उर्वरित राज्याशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटला आहे. सोशल मीडियावर (Social media) लोक आसाममधील पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करत आहेत. आसामच्या लोकांच्या वेदना उष्णतेची भावना दूर करतील.

आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे की होजईमधील ७८,१५७ आणि कछारमधील ५१,३५७ लोकांना पुराचा फटका बसला आहे. जोरदार भूस्खलन आणि संततधार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचले असल्याची माहिती ईशान्य सीमा रेल्वेने अधिकाऱ्यांनी दिली आहे. आसामच्या लुमडिंग-बदरपूर हिल विभागात २ दिवसांपासून २ गाड्या अडकल्या होते.

हवाई दलाच्या मदतीने सुमारे २८०० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दक्षिण आसाम, त्रिपुरा आणि मिझोरामसाठीचे रेल्वे मार्ग गेल्या २ दिवसांपासून बंद आहेत. गुवाहाटीची वाईट स्थिती निर्माण झाली आहे. गुवाहाटीतील बहुतांश भागात ४-५ दिवसांपासून पाणी साचले आहे. शुक्रवारपासून राज्यभरात पाऊस पडत आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांवर चिखल साचल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गुवाहाटी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक ए के भगवती यांनी शहरी पुरावर खूप अभ्यास केला आहे. ते म्हणाले की, ज्या भागात पूर आणि पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे ते एकेकाळी ओलसर होते. शहर वाढल्याने सखल भागात बांधकामेही वाढली. जलद शहरीकरणामुळे पाणथळ जागा कमी झाल्या आणि काँक्रीटचे क्षेत्र वाढले ज्यामुळे शहरात पूर आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Shinde: पीएम मोदींप्रमाणे मी ही सुट्टी न घेता काम करतोय: मुख्यमंत्री शिंदे

WhatsApp New Feature: वॉट्सअ‍ॅपच्या स्टोअरेजची चिंता मिटली; वाचा नवं Chat Filterer नेमकं आहे तरी काय?

Today's Marathi News Live : ठाकरेंच्या खासदाराने १० वर्ष टीकेशिवाय दुसरं काही केलं नाही, नारायण राणेंची टीका

Hair Care Tips: सिल्की स्मूथ केसांसाठी घरच्याघरी करा केराटिन ट्रिटमेंट

Girish Mahajan News : खडसेंनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा मग भाजपचा प्रचार करावा; मंत्री गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT