America Saam Tv
देश विदेश

अमेरिकेतील धक्कादायक प्रकार! अंगात कपड्यामधून ५२ जिवंत साप अन् सरड्यांची तस्करी

सोने आणि अमली पदार्थांची शरीरामधून, बॅगेतील चोरकप्प्यामधून तस्करी केल्याची अनेक उदाहरणे आपण बघितले आहेत.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: सोने आणि अमली पदार्थांची शरीरामधून, बॅगेतील चोरकप्प्यामधून, लपवून तस्करी (Smuggling) केल्याची अनेक उदाहरणे आपण बघितले आहेत. मात्र, मेक्सिकोची सीमा ओलांडून अमेरिकेमध्ये (America) प्रवेश केलेल्या एका माणसाने आपल्या कपड्यांमध्ये चक्क दुर्मीळ जातीचे ५२ जिवंत साप (snake) आणि सरडे (Lizards) लपवून आणले होते. तस्करीचा हा आगळावेगळा प्रकार बघून अमेरिकेचे (America) कस्टम अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

हे देखील पहा-

पशुपक्ष्यांच्या अवैध विक्रीमधून तस्कर खूप जास्त प्रमाणात पैसा कमावत असतात. मेक्सिकोतून ट्रक (Truck) घेऊन अमेरिकेमध्ये आलेल्या चालकाची कस्टम अधिकाऱ्यांनी झडती घेतली असता. त्याच्या जॅकेटमध्ये, पँटच्या खिशांमध्ये ठेवलेल्या ५२ छोट्या आकाराच्या पिशव्यांमध्ये ४३ जिवंत सरडे आणि ९ साप आढळून आले आहेत. प्राण्यांची अमेरिकेमध्ये तस्करी होण्याचे प्रकार नेहमीच होत असतात.

मात्र, जिवंत प्राण्यांना (animals) कपड्यांमध्ये लपवून तस्करी करण्याची कल्पना त्या ट्रकचालकाशिवाय या अगोदर कोणाला सुचल नव्हतं. पिशव्यात खूप काळ बंदिस्त राहिल्याने साप, सरडे हे अर्धमेले झाले होते. त्यांच्यावर तत्काळ प्राणितज्ज्ञांकडून उपचार करण्यात आले आहे. या ट्रकचालकाला अमेरिकेच्या कस्टम अधिकाऱ्यांनी अटक करण्यात आले आहे. अमेरिका व मेक्सिकोला लागून असलेल्या सीमाभागामध्ये एक नदी आहे.

दुर्मीळ जातीचे २५ पोपट अमेरिकेत चोरट्या पद्धतीने आणले जाणार होते. हे पोपट असलेल्या पिंजऱ्याची पेटी मेक्सिकोच्या हद्दीमधून या नदीमध्ये सोडण्यात आली आहे. ही पेटी तरंगत ठेवण्यासाठी तस्करांनी टायरच्या आत मधील नळ्यांचा खुबीने वापर केला होता. दुर्मीळ जातीचे पक्षी, माकडे, श्वान यांची पिल्ले, अशा विविध प्रकारच्या प्राण्यांची तस्करी लॅटिन अमेरिकेतील देशामधून अमेरिकेमध्ये केली जाते. वन्यप्राण्यांच्या खरेदी- विक्रीवर बंदी असली, तरी अमेरिकेत हे प्राणी लपवून या पद्धतीने विकत घेणारे शौकीन आहेत. त्याकरिता ते काही हजार डॉलर देखील मोजायला तयार असतात.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

Realme 15 आणि 15 pro सिरीजची एंट्री! जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काय आहे खास

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Baramati Accident: सोन्यासारखा मुलगा आणि २ नातींचा अपघाती मृत्यू, धक्का सहन न झाल्याने आजोबांनीही सोडलं प्राण

'अल्लाहू अकबर...विमानात बॉम्ब आहे' प्रवाशानं घातला गोंधळ, VIDEO समोर; विमानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT