Smart Watch Save Life Saam Digital
देश विदेश

Smart Watch Save Life: धावताना आला ह्रदयविकाराचा झटका! आसपास कोणी नव्हतं, मात्र एका घड्याळाने वाचवला जीव; कसं? ते जाणून घ्या

Smart Watch Save Life: ब्रिटनमधील एका कंपनीच्या सीईओला सकाळी धावत असताना ह्रदयविकाराचा झटका आला. अशावेळी एक स्मार्ट घड्याळ त्यांच्यासाठी देवदूत ठरले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Smart Watch Save Life

ब्रिटनमधील एका कंपनीच्या सीईओला सकाळी धावत असताना ह्रदयविकाराचा झटका आला, तोही आजुबाजुला कोणी नसताना. छातीत प्रचंड वेदना होतायेत. वेळही खूप कमी होता. त्यामुळे जिव वाचणे जवळपास अशक्यच होते. अशावेळी एक स्मार्ट घड्याळ त्यांच्यासाठी देवदूत ठरले आहे. जॉन हॉकी वेल्सचे सीईओ पॉल वाफम यांना या घड्याळामुळे जीवदान मिळाले आहे.

४२ वर्षीय पॉल दररोज सकाळी स्वानसीच्या मॉरिस्टन भागात धावण्यासाठी जातात. यावेळीही ते नेहमीप्रमाणे धावण्यासाठी गेले होते. थोड्यावेळाने त्यांच्या छातीत वेदना जाणवू लागल्या. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. कोणीतरी मदतीला येईल म्हणून त्यांनी आजूबाजूला पाहिलं, मात्र जवळपास कोणीही नव्हते. काही क्षण त्यांना काहीही सूचले नाही. स्वत: हॉस्पिटलमध्ये जाण्याची परिस्थिती नाही. त्याचवेळी त्यांना आपण स्मार्ट घड्याळ घातल्याची आठवण झाली. त्यांनी लगेचच घड्याळाच्या मदतीने आपली पत्नी लॉराला संपर्क केला आणि तिला बोलावून घेतलं. सुदैवाने ते जास्त दूर नव्हते. पाच मिनीटात लॉरा तिथे पोहोचली आणि पॉल यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या आपली प्रकृती स्थिर असून अविस्मरणीय असा हा प्रसंग होता, असे पॉल यांनी म्हटले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर, ह्रदयाकडे जाणाऱ्या धमण्यांमध्ये ब्लॉकेजमुळे त्यांना झटका आल्याचे निदान झाले. सहा दिवस पूर्ण उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान ही घटना सर्वांसाठी धक्कादायक होती कारण आपलं वजन जास्त नाही. शिवाय स्वताला तंदरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तरीही ह्रदयविकाराचा झटका आला होता, असं पॉल सांगतात.

कसा होतो स्मार्ट वॉचचा उपयोग

नवीन जनरेशनमधील स्मार्टवॉचद्वारे कॉल करता येतो आणि आलेला कॉल उचलताही येऊ शकतो. एखाद्याप्रसंगी मोबाईल किंवा दुसऱ्या ठिकाणी संपर्क करण्यासारखे साधन उपलब्ध नसेल तर अशावेळी स्मार्टवॉचचा उपयोग करता येतो. शिवाय ह्दयाचे ठोके, ईसीजीसह आरोग्याविषयी अनेक घटक या स्मार्टवॉचद्वारे मोजता येतात. त्यामुळे याआधीही स्मार्ट वॉचमुळे जीव वाचण्याच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT