क्रूरतेचा कळस! चिमुरड्याच्या छोट्याशा चुकीमुळे मुख्याध्यापकानीं दिली तालिबानी शिक्षा Saam Tv
देश विदेश

क्रूरतेचा कळस! चिमुरड्याच्या छोट्याशा चुकीमुळे मुख्याध्यापकानीं दिली तालिबानी शिक्षा

उत्तर प्रदेश मधील अहरोरा मधील एका खासगी शाळेत शिक्षकाचा क्रूर चेहरा समोर आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश मधील Uttar Pradesh अहरोरा मधील एका खासगी शाळेत शिक्षकाचा क्रूर चेहरा समोर आला आहे. या ठिकाणी दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलाच्या छोटाशा चुकीमुळे शाळेचे व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकांना प्रचंड राग आला होता. त्यांनी मुलाला बाल्कनीच्या बाहेर उलटे लटकवले आहे. बराच वेळ त्यांनी मुलाला त्याच स्थितीमध्ये ठेवले आहे. यादरम्यान कोणीतरी या दृश्याचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

यानंतर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार अहरोरा मधील सद्भावना शाळेमधील आहे. या ठिकाणी मुलांना तालिबानी शिक्षा देण्यात येत आहे. या मुलाचे नाव सोनू यादव असून त्याचे वय ७ वर्षे आहे. शाळेच्या वेळेत हा मुलगा शाळेबाहेर पाणीपुरी खायला गेला होता आणि ही बाब मुख्याध्यापक मनोज विश्वकर्मा यांना आवडलेली नाही.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आणि फोटो जेव्हा व्हायरल झाला त्यावर प्रशासन आणि पोलिसात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. डीएम यांच्या निर्देशावर रात्री मुलाच्या वडिलांनी मुख्याध्यापक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनूचे वडील रंजीत यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार की, शाळेतून परतल्यानंतर सोनू कोणाबरोबरच काहीच बोलत नव्हता आणि सतत रडत होता.

बऱ्याचदा विचारल्यावर त्याने घटनेविषयी सांगितले आहे. यादरम्यान त्याच्या बरोबर झालेल्या अत्याचाराचा व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर सोनू खूप घाबरला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आता मनोज विश्वकर्मा यांनी या घटनेचे स्पष्टीकरण दिले आहे.

मी जाणून- बुजून असे केले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. चुकून त्यांनी बालकनी मध्ये त्याला उलटे पकडल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले आहे. या विषयी त्यांनी माफीदेखील मागितली आहे. मुलाच्या वडिलांनी याबाबत पोलिसात तक्रार केली असून, यावर कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट सांगितले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

SCROLL FOR NEXT