Baby in Washing Machine : देव तारी त्याला कोण मारी ही म्हण तुम्ही अनेक वेळा ऐकली असेल. अशा घटना देखील पाहिल्या असतील. अशीच एक आश्चर्यकारक घटना दिल्ली येथे घडली आहे. या घटनेत एक बाळ वॉशींग मशीनमध्ये पडलं. जवळपास १५ मिनिटं बाळ साबणाच्या फेसात फिरत होतं. त्यामुळे त्याच्या नाकातोंडात पूर्ण पाणी गेलं होतं. बाळ खेळता खेळता खुर्चीवर चढलं आणि पाण्यात पडलं. त्यावेळी त्याची आई घरात नव्हती. ती बाहेर काही कामासाठी गेली होती. (Latest Baby in Washing Machine Accident News)
परत आल्यावर तिने बाळाला खूप शोधलं. मात्र बाळ दिसत नसल्याने तिने वॉशिंग मशीन तपासली तेव्हा बाळ त्यात पडलं होतं. त्याचा आवाजही बंद झाला होता. आईने तात्काळ बाळाला फोर्टिज रुग्णालयात दाखल केलं. अवघ्या दिड वर्षांच्या या बाळाला सुरूवातीला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं. नंतर १२ दिवस त्याच्यावर उपचार झाले. अशात सुदैवाने या बाळाची प्रकृती आता ठिक आहे. बाळ आता चालत देखील आहे.
सदर घटनेविषयी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर म्हणाले की, बाळ जेव्हा आमच्याकडे आलं होतं तेव्हा त्याला श्वास घेता येत नव्हता. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. यामुळे त्याचा जीव वाचेल याची आम्ही आशा सोडली होती. मात्र तसे झाले नाही. या बाळालाच मुळात जगायचे आहे त्यामुळे बाळाने स्वत:मृत्यूवर मात दिली.
बाळ जेव्हा वॉशिंग मशीनमध्ये पडलं तेव्हा त्यात कपडे होते. तसेच विविध सर्प पावडर टाकली होती. त्याचा सर्व फेस त्याच्या डोळ्यांना लागला. त्यामुळे डोळ्यांनाही इजा झाली होती. तसेच थंडीमुळे त्याला निमोनिया देखील झाला होता. मात्र या बाळाच्या मेंदूला कोणतीही इजा झाली नाही. त्यामुळेच त्याचे प्राण वाचवण्यात यश मिळाल्याचं डॉक्टर म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.