Facebook Friend/Rape Case SaamTV
देश विदेश

धक्कादायक | Facebook Friendला दिल्या झोपेच्या गोळ्या; बेशुद्ध अवस्थेत तरुणीवरती बलात्कार

आरोपीने कोल्ड्रींग्स मध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून तरुणीला प्यायला दिले. ती बेशुद्ध पडल्यावरती तिच्यावर बलात्कार केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोपाळ : फेसबुकवरती Facebbok मैत्री झालेल्या मैत्रीणीला नोकरीसाठी मुलाखतीला बोलवून तिच्यावरती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार झालेली मुलगी मूळची UP मधील झाशी येथील राहणारी आहे. मात्र ती मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे पोलीस भरतीच्या परीक्षेची तयारी करत होती. अशातच तिची फेसबुक वरती आवेश नावाच्या मुलाशी मैत्री झाली. आवेशने तिला नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी ग्वाल्हेरला बोलावून घेतले आणि तिच्यावरती अत्याचार केला असल्याचा आरोप तरुणीने केला आहे. (Sleeping pills given to Facebook Friend; Accused raped while unconscious)

हे देखील पहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आवेश या दोघांची फेसबुकवरती 2 महिन्यांपूर्वी मैत्री झाली होती. त्यानंतर आरोपी आवेशने तिला नोकरीच्या मुलाखतीच्या बोलावले. तरुणी ग्वाल्हेरला आल्यावर आवेशने तिला बहोदापूर येथे भाड्याच्या खोलीत घेऊन गेल्यावरती कोल्ड्रींग्स मध्ये झोपेच्या गोळ्या (Sleeping pills) मिसळून तिला प्यायला दिले दरम्यान ती बेशुद्ध पडल्यावरती तिच्यावर बलात्कार केला. शिवाय बलात्काराचं व्हिडीओ शूटींग (Video shooting) देखील आरोपीने केलं आहे.

आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने त्या मुलीची शालेय डॉक्युमेंट (Documents) आपल्याकडे ठेवून घेतली आणि रविवारी पुन्हा तिला डॉक्युमेंटस् घेऊन जा असे सांगितलं ती डॉक्युमेंट घ्यायला आल्यावर आरोपीने आपल्यावरती पुन्हा बलात्कार केल्याचे पिडीतीने सांगितले आहे. दरम्यान बहोदापूर पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून. आरोपी आवेशला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झालं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT