ST चालकाने पिलं विष.. "2 हजाराच्या पगारात सांगा कशी करणार दिवाळी"

नाशिक जिल्हयातील कळवण ST डेपोतील चालकाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न
MSRTC
MSRTCअभिजीत सोनावणे
Published On

नाशिक : नाशिक जिल्हयातील कळवण एसटी डेपोतील (Report ST Depot) ST चालकाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवानं वेळीच त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात उचरासाठी दाखल केल्याने सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

प्रमोद शिवाजी सुर्यवंशी (Pramod Shivaji Suryavanshi) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चालकाचे नाव असून काही दिवसांपासून ते सुट्टीवर असल्याने त्यांनी पगारी रजा अर्ज (Salary leave application) दिला होता. मात्र अर्ज वेळेत मंजूर न झाल्याने 2 हजार रुपये तुटपुंजा पगार आणि अडीच हजार रुपये दिवाळीचा बोनस असे अवघे साडेचार हजार रुपये त्यांना  मिळाले. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले.  तोंडावर दिवाळी Diwali असल्याने आणि घरात आई-पत्नीच्या आजारपणाचा खर्च कसा भागवायचा, या नैराश्यातून त्यांनी विषारी औषध सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

MSRTC
ड्राइव्हरची झोप पडली महागात, मुंबई-अहमदाबाद हायवेवरती अपघात; 150 तेलाचे ड्रम पडल्याने Traffic जाम

महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे MSRTC विलगिकरण राज्य सरकारमध्ये करावे या मागणीसाठी एसटी कामगारांनी आंदोलन केले होते तसेच सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या ST employees काही मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र अजूनही एसटी कामगारांचे हाल काही संपले नसल्याचेच आजच्या या घटनेवरुन सिद्ध होत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com