मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) आज सकाळी 5 च्या सुमारास तेलाने भरलेल्या टँकरचा अपघात झाला आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना अचानक वाहन चालकाचा डोळा लागल्यामुळे टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर रस्त्यावरील विभाजकावर जाऊन मोठ्याने आदळला त्यामुळे मोठ्या प्रमाणात या महामार्गावर वाहतूकीचा खोळंबा झाला.
हे देखील पहा -
या अपघातात Accident वाहन चालक गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच टँकरचा अपघात झाल्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या 150 ते 180 तेलाचे ड्रम संपूर्ण रस्त्यावर पडले होते त्यामुळे महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील पोलिसांनी Highway Police घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक कोंडी नियंत्रित केली व स्थानिक लोकांच्या मदतीनं रस्त्यावर पसरलेले तेलाचे ड्रम काढण्यात आले आहेत.
मात्र सततच्या अवजड वाहनांच्या या अपघातांमुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचे प्रमाण वाढत असून या वाहनचालकांनी आपल्यासह अनेकांचे जीव धोक्यात घालू नयेत. शरीराला आवश्यक तेवढी झाप घेऊन वाहन चालवावे तसेच झोप आल्यास गाडी बाजूला घ्यावी अशी त्यांनी सांगण्याची वेळ आली आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.