Coal Scam Delhi Special Court convicts Vijay Darda Saam Tv
देश विदेश

Coal Scam: कोळसा खाण वाटप प्रकरणी विजय दर्डा यांच्यासह सहा जण दोषी, पुढच्या आठवड्यात न्यायालय सुनावणार शिक्षा

साम टिव्ही ब्युरो

Coal Scam Delhi Special Court convicts Vijay Darda: छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. या सर्वांच्या शिक्षेचा निर्णय न्यायालय १८ जुलै रोजी सुनावणार आहे.

माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी समरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांचा या प्रकरणात सहभाग आहे.

न्यायालयाने त्यांना आयपीसी कलम १२०बी, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणी आधीही बऱ्याच लोकांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल अशी मोठी नावे आहेत.

आणखीही लोकांना होऊ शकते अटक

दरम्यान, या प्रकरणी ईडीकडून माजी जिल्हाधिकारी आयएएस रानू साहू यांच्यासह अनेकांची चौकशी सुरू आहे. कोळसा खाण वाटपातील अनियमिततेप्रकरणाशी संबंधित आहे. ज्यामध्ये आज दिल्लीतील ईडी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. भविष्यात या घोटाळ्याशी संबंधित अनेक बड्या लोकांना अटक करू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT