Bacchu Kadu Press Conference: अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे राष्ट्रवादीच्या (NCP) सहकार्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. बच्चू कडू हे सत्तेत राहणार की आपली वेगळी भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बच्चू कडू यांनी सर्व माध्यमांसमोर ११ वाजता आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार त्यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी आजच मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो, पण मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) मला फोन केला आणि ते अर्ध्या तासांपासून मला मनवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर तूर्तास मी मंत्रीपदाचा दावा पुढे ढकलला आहे.', असे बच्चू कडू यांनी सांगितले.
बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. सर्व काही पदासाठी नसतं. काही लोकं कमेंट्स करतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही, ५० खोके वगैरे. काही लोकांकडून चारित्रहनन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी त्याची पर्वा करत नाही.'
बच्चू कडूंनी पुढे सांगितले की, 'आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी, शहीद परिवार, कामगार, शेत मजूरांसाठी काम करणार आहोत. मी आज मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्री गेल्या अर्ध्या तासांपासून मला सतत फोन करत आहेत. ते सतत माझी समजूत काढत आहेत. तू जो निर्णय घेशील तो मला भेटल्यानंतर घे अशी विनंती त्यांनी केली.'
तसंच, 'मुख्यमंत्र्यांच्या विनंतीमुळे आजचा मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय मी पुढे ढकलला आहे. मुख्यमंत्र्यांची विनंती म्हणून मी १८ तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे. १७ तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर १८ तारखेला मी ठाम राहणार आहे. १८ तारखेला माझा निर्णय मी जाहीर करणार आहे. मंत्रिपदाचा हव्यास बच्चू कडूनला कधी नव्हता आणि नसणार आहे.' , असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.