Mallikarjun Kharge  Saam Tv
देश विदेश

Electoral Bonds: इलेक्टोरल बाँड्सची एसआयटी चौकशी करा, तोपर्यंत भाजपच्या बँक खात्यातील व्यवहारांवर बंदी घालावी; खरगे यांची मागणी

Satish Kengar

Mallikarjun Kharge On Electoral Bonds:

इलेक्टोरल बाँड्सचा मुद्दा सध्या देशभरात गाजत आहे. यातच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधत या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हायला हवी. हा तपास पूर्ण होईपर्यंत भाजपच्या बँक खात्यातील व्यवहारांवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

भाजपने इलेक्टोरल बाँड्समधून हजारो कोटी रुपये गोळा केले. काँग्रेसला देणग्या मिळाल्या होत्या, पण आमच्या बँक खात्यातील व्यवहारांवर बंदी घालण्यात आली होती. विरोधी पक्षाच्या बँक खात्याच्या व्यवहारांवर बंदी घातली तर निवडणूक कशी लढवणार, समान संधी कुठे आहे, असे ते म्हणाले. अशा निवडणुकांमध्ये आमच्यासाठी लेव्हल प्लेइंग फिल्ड नाही, असंही ते म्हणाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना खाऊंगा, ना खाने दूंगा म्हटले होते. आता भाजपने इलेक्टोरल बाँड्समधून पैसा कमावल्याचे उघड झाले आहे.'' याआधीही मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसकडे निवडणूक लढवण्यासाठीही निधी नसल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते, ''ज्या बँक खात्यांमध्ये लोकांनी दिलेल्या देणग्या काँग्रेसकडे जमा केल्या होत्या, ती केंद्र सरकारने गोठवली आहेत आणि आयकर विभागाने पक्षाला मोठा दंड ठोठावला आहे.''  (Latest Marathi News)

भाजपने आयकर विभागाची मदत घेऊन काँग्रेसची खाती गोठवली आणि दंड ठोठावला, असा आरोप खरगे यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही भाजप इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून मिळालेल्या हजारो कोटी रुपयांची माहिती देण्यास तयार नाही, असा दावा त्यांनी केला.

ते म्हणाले, ''हे आमच्या पक्षाचे पैसे होते जे तुम्ही लोकांनी देणगी म्हणून दिले होते, त्यांनी ते गोठवले आहेत आणि आमच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. तर त्यांनी (भाजप) बाँडचे तपशील उघड केलेले नाहीत. कारण असं केल्यास त्यांची चोरी आणि गैरप्रकार उघडकीस येतील.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT