लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या सिंगापूर एअरलाइन्सच्या बोइंग ७७७-३०ईआर या फ्लाइटमध्ये एक दुर्घटना घडली. विमान एअर टर्ब्युलन्सची समस्या आली. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झालेत. सिंगापूर एअरलाइन्सचे बोइंग ७७७-३००ER विमान भारतीय वेळेनुसार मंगळवारी दुपारी २.४५ वाजता लंडनहून उड्डाण केलं होतं. प्रवासा दरम्यान या विमानाला अवकाशातील अपवादात्मक ‘एअर टर्बुलन्स’ परिस्थितीला सामोरे जावे लागले.
डेली मेलमध्ये आलेल्या वृत्तानुसार,खराब हवामानामुळे टेकऑफनंतर ३७ हजार फूट उंचावर असताना हे विमानात टर्ब्युलेन्सची समस्या आली. त्यामुळे विमानाला जोरात झटके जाणवू लागले. त्यावेळी विमान म्यानमारच्या हवाई हद्दीजवळ होते. अंदमानचा समुद्र पार केल्यानंतर हे विमान ५ मिनिटांत ३७ हजार फूट उंचीवरून ३१ हजार फूट खाली आले होते. या एअर टर्ब्युलेन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालीय.
प्रवाशांनी सांगितले की, विमानाची उंची कमी करत असताना त्यांना सीट बेल्ट घालण्याचा इशारा देण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेक प्रवाशी त्यांच्या सीटवर आदळले. त्यांचे डोके बॅग्स ठेवण्याच्या रॅकला आदळले. अनेकांना दुखापत झाली. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. यानंतर भारतीय वेळेनुसार मंगळवार दुपारी २.१५ वाजता विमान बँकॉककडे वळवण्यात आले. येथील सुवर्णभूमी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
या विमानात २११ प्रवासी आणि १८ क्रू मेंबर्स होते. हे विमान सिंगापूरच्या चांगी विमानतळावर संध्याकाळी ६:१० वाजता उतरणार होते. विमान उतरल्यानंतर लगेचच विमानतळावर अनेक रुग्णवाहिका पोहोचल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
टर्बुलन्स म्हणजे काय?
विमानातील टर्ब्युलेन्स म्हणजे हवेच्या प्रवाहात व्यत्यय येणे ज्यामुळे विमान उडण्यास मदत होते. जेव्हा हे घडते, तेव्हा विमान थरथरायला लागते आणि अनियमित उभ्या गतीमध्ये जाते, म्हणजेच ते त्याच्या नियमित मार्गापासून विचलित होते. याला टर्बुलन्स म्हणतात. अनेक वेळा टर्बुलन्समुळे विमान अचानक काही फूट उंचीवरून खाली पडू लागते. दरम्यान टर्बुलन्समध्ये विमान उडवणे हे काहीसे खडबडीत रस्त्यावर कार चालवण्यासारखेच असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.