Siddaramaiah Swearing In Today
Siddaramaiah Swearing In Today SAAM TV
देश विदेश

Siddaramaiah Swearing In Today: सिद्धरामय्या आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ! डीके शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री; 20 हून आमदारांचाही शपथविधी

Chandrakant Jagtap

Siddaramaiah will take oath as CM today DK Shivakumar to be Deputy CM: कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आज शपथ घेणार आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे 30वे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू करणार आहेत. त्यांच्यासोबत कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याशिवा 20 आमदार देखील या सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यामध्ये डीके आणि सिद्धरामय्या यांच्या छावणीतील निष्ठावंत आमदारांचा समावेश असेल.

कर्नाटक निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. यात काँग्रेसने 135 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला 66 आणि जेडीएसला 19 जागा मिळाल्या. बहुमताचा आकडा गाठल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्री निवडण्यासाठी दीर्घ विचारमंथन केले आणि त्यानंतर सिद्धरामय्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. याआधी काँग्रेस कर्नाटकात तीन उपमुख्यमंत्रीपदे देऊ शकते अशी माहिती होती. मात्र आता डीके शिवकुमार हे एकमेव उपमुख्यमंत्री असतील.

सिद्धरामय्या दुपारी 12.30 वाजता घेणार शपथ

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. कांतीरवा स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी गेल्या मंगळवारपासून अधिकारी कामाला लागले आहेत. काँग्रेसलाही या शपथविधीतून विरोधी एकजूट दाखवायची आहे. अशा स्थितीत पाहुण्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. स्टेडियमवर पोहोचल्यानंतर डीके शिवकुमार यांनी शपथविधीच्या तयारीचा आढावाही घेतला. (Breaking News)

हे मंत्री शपथ घेऊ शकतात

सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात 25 ते 26 मंत्री शपथ घेऊ शकतात अशी माहिती आहे. परंतु आतापर्यंत फक्त 10 आमदारांचीच यादी समोर आली आहे. यात परमेश्वरा, रामलिंगा रेड्डी, केजे जॉर्ज, एचके पाटील, एमबी पाटील, सतीश जारकीहोली, यूटी कधर, लक्ष्मी हेब्बाळकर, टीबी जयचंद्र आणि एचसी महादेवप्पा यांच्या नावाच समावेश आहे. काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळाची यादी तयार करत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या मंत्रीमंडळात सर्व वर्गातील आमदारांचा सामावेश असण्याची शक्यात आहे. (Latest Political News)

शपथविधी सोहळ्याला या नेत्यांना निमंत्रण

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अनेक मुख्यमंत्री आणि नेत्यांना या शपथविधीसाठी निमंत्रण पाठवले आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि एनसी प्रमुख फारूक अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा, सीपीआय एमचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: विश्वासू नोकरानेच केला हात साफ! साथीदारांच्या मदतीने तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Ghee Benefits : खा तूप येईल रुप; आरोग्यावर होणारे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीच नसतील

Karnataka Politics: कर्नाटक काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव; भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार, काय आहे प्रकरण?

Today's Marathi News Live : अहमदनगरमध्ये सुजय विखेंची ताकद वाढणार, महायुतीने आखला मास्टर प्लान!

SCROLL FOR NEXT