Siddaramaiah resigns as Karnataka Chief Minister amid speculation of leadership change, with DK Shivakumar likely to take over. saam tv
देश विदेश

मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा; देशाच्या राजकारणात खळबळ

Karnataka Cm Siddaramaiah Resigns Political Crisis: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी अचानक राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होण्याची शक्यता वाढली असून निवडणुकांपूर्वी काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत.

Omkar Sonawane

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामाया यांनी राजीनामा दिला असून कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून डी.के शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. अनेकवेळा आमदारांनी दिल्ली येथे जाऊन हायकमांडची भेट घेतली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे मल्लीकार्जून खरगे, तसेच राहुल गांधी यांनी अखेर ग्रीन सिग्नल दिल्याने सिद्धरामाया यांनी राजीनामा दिला. पुढील वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्याआधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर, सिद्धरामय्या यांनी सांगितले की, हायकमांडने सांगितल्याप्रमाणे आपण हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे असेही सांगितले की, त्यांचा पक्षाला आणि सरकारला पूर्ण पाठिंबा असेल आणि राज्याचे हित त्यांच्यासाठी सर्वोच्च आहे. तसेच त्यांनी कर्नाटकच्या हितासाठी काम करत राहण्याची शपथ घेतली. तसेच, पक्षाचे सर्व आमदार एकजूट असल्याचेही त्यांनी सांगितले. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या लोक भवनात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, राज्यपाल लोक भवनात उपस्थित नसल्यामुळे, त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांच्या सचिवांकडे सादर केला. राज्यपाल सायंकाळपर्यंत बंगळूरला परततील.

डी के शिवकुमार होणार नवीन मुख्यमंत्री

डी.के शिवकुमार नवे मुख्यमंत्री असून कर्नाटकच्या सरकारमध्ये दोन ते तीन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती होण्याची शक्यता आहे. डी.के शिवकुमार हे कर्नाटक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून त्या पदावरून ते लवकरच पायउतार होतील आणि सतीश जरकीहोली हे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सतीश जरकीहोली हे बेळगावचे असून ते अनुसूचित जाती (ST) मधून येतात. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय संतुलन राखणे हे देखील मोठे आव्हान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शाळेच्या हॉस्टेलला भीषण आग; १६ विद्यार्थिनींचा होरपळून मृत्यू , अनेकांची मदतीसाठी धावाधाव

'कल्याणच्या चुलबुली'चा बोल्ड अंदाज! शिवाली परबचा सिल्वर वनपीसमधील फोटो केले शेअर

Kalyan : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात तुफान हाणामारी, फेरीवाल्यांनी एकमेकांची डोकी फोडली

Drinks to lower cholesterol: नसांमध्ये जमलेलं घाण कोलेस्ट्रॉल लगेच पडेल बाहेर; हे ४ घरगुती ड्रिंक्स करा ट्राय

Maharashtra News Live Update: कसारा रेल्वे स्थानकात महानगरी एक्सप्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून निघाला धूर

SCROLL FOR NEXT