10 वर्षांनंतर शेंगदाणा विक्रत्याला पैसे परत करण्यासाठी भावंड USA मधून आंध्र प्रदेशात  Saam Tv
देश विदेश

10 वर्षांनंतर शेंगदाणा विक्रत्याला पैसे परत करण्यासाठी भावंड USA मधून आंध्र प्रदेशात

या भावंडांनी त्याच्या कुटुंबाला २५ हजार रुपये देण्याचे ठरवले.

वृत्तसंस्था

2010 मध्ये नेमानी प्रणव आणि त्यांची बहीण सुचिता यांनी त्यांचे वडील मोहन यांच्यासह आंध्र प्रदेशातील यू कोथापल्ली समुद्रकिनाऱ्याला भेट दिली. त्यांनी सत्ताय्या नावाच्या एका शेंगदाणा विक्रेत्याकडून शेंगदाणे विकत घेतले होते आणि ते खरेदी केल्यानंतर मोहनला लक्षात आले की आपल्याकडे पैसे नाहीत.

सत्ताय्याने त्यांना फुकटात शेंगदाणे खायला दिले. मात्र, मानी प्रणव यांनी त्या शेंगदाणा विक्रेत्याला पैसे देण्याचे आश्वासन दिले आणि त्यांसोबत फोटोही काढला. ते युनायटेड स्टेट्समध्ये राहणारे NRI असल्याने त्यांना या शेंगदाण्याचे पैसे लवकरच परतफेड करता आले नाही.

हे देखील पहा -

आता, जवळपास 11 वर्षांनंतर, नेमानी आणि त्यांची बहीण सुचिता भारतात परतले आणि त्यांनी त्या शेंगदाणा विक्रेत्याचा शोध घेऊन त्याला परतफेड करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील मोहन पैसे परत करण्यास उत्सुक होते आणि त्यांनी त्या शेंगदाणा विक्रेत्याचा शोध घेण्यासाठी त्यांचे मित्र काकीनाडा शहराचे आमदार चंद्रशेखर रेड्डी यांची मदत घेतली.

आमदाराने फेसबुकवर शेंगदाणा विक्रेत्याची एक पोस्ट टाकली. नागुलापल्ली या त्यांच्या मूळ गावातील काही लोकांनी आमदारांच्या पोस्ट पहिली आणि त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की तो शेंगदाणा विक्रता आता नाहीत. त्यानंतर या भावंडांनी त्याच्या कुटुंबाला २५ हजार रुपये देण्याचे ठरवले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!

Diabetes : डायबिटीज होण्याआधी शरीर देतं संकेत! सकाळच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको, लगेच तपासा ब्लड शुगर

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT