Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

Bharat Jadhav

चिंतेचं कारण

उचकी ही अशी समस्या आहे जी कोणालाही आणि कधीही होऊ शकते. सहसा, त्या एक-दोन मिनिटांत थांबतात, परंतु जर त्या १५ मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ टिकून राहिल्या, तर त्या कधी थांबतील का, याबद्दल चिंता वाटू शकते.

What causes hiccups that last for more than 15 minutes

खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी लागते?

उचकी लागल्यावर आपले घरचे कोणीतरी आठवण काढत असेल, असे म्हणतात. पण खरंच कोणी आठवण काढली की उचकी लागते का? या वाक्यामध्ये किती तथ्य आहे का? खरंतर उचकी येण्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. उचकी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.

What causes hiccups that last for more than 15 minutes

उचकी कशी येते?

'हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंग'नुसार, उचकी ही एक अनैच्छिक हालचाल आहे. यात श्वासोच्छवासासाठी कारणीभूत असलेले 'डायफ्राम' हे स्नायू अचानक आकुंचन पावतात. या प्रक्रियेत बरगड्यांमधील स्नायूंनाही अचानक झटका बसतो. वेगाने श्वास आत घेतला जातो. त्याचवेळी घशातील स्वरतंतूंच्या जवळील मार्ग बंद होतो आणि त्यातून 'हिक' असा विशिष्ट आवाज निर्माण होतो.

What causes hiccups that last for more than 15 minutes

३० वेळा येते उचकी

बहुतेक प्रकरणांमध्ये उचकी येण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नसते आणि ती आपोआप थांबते. ३० किंवा त्याहून अधिक वेळा उचकी आल्यानंतर ही स्थिती पूर्ववत होते.

What causes hiccups that last for more than 15 minutes

उचकी येण्याची कारणे

ही समस्या अति-आहार, मद्यपानाचे अतिसेवन किंवा पोटात अतिरिक्त वायू साचल्यामुळे उद्भवू शकते.शरीराच्या बाह्य किंवा अंतर्गत तापमानात होणारे अचानक बदल. सिगारेट ओढणे.तीव्र उत्साह, तणाव किंवा इतर भावनांमुळेही अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

What causes hiccups that last for more than 15 minutes

उचकीपासून त्वरित आराम कसा मिळेल

जीभ हळूच बाहेरच्या दिशेने ओढल्याने किंवा पाणी गिळल्याने उचकी थांबण्यास मदत होऊ शकते. थोडी दाणेदार साखर गिळणे, अतिशय थंड पाणी थोडे-थोडे करून पिणे किंवा पाण्याने गुळण्या करणे यामुळेही आराम मिळू शकतो.

What causes hiccups that last for more than 15 minutes

लिंबू चाखा

लिंबूचा छोटासा तुकडा चाखल्याने तोंडात आणि घशात एक विशिष्ट संवेदना निर्माण होते, ज्यामुळे उचकी थांबण्यास मदत होऊ शकते. किंवा मानेच्या मागील भागावर हलक्या हाताने मालिश करावी. किंवा हलक्या हाताने थोपटल्यास आराम मिळू शकतो.

What causes hiccups that last for more than 15 minutes