Shubanshu Shukla the second Indian to go into space after Rakesh Sharma Saam Tv News
देश विदेश

Shubanshu Shukla : 'माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे'; शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून दिला मेसेज; आईचे डोळे पाणावले

Shubanshu Shukla : शुभांशू शुक्लाने अंतराळात झेप घेत नवा इतिहास रचलाय....मात्र हे शुभांशू शुक्ला कोण आहेत? आणि एक्सिओम-4 ही अंतराळ मोहीम भारतासाठी का महत्वाची आहे? पाहूयात....

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

नासाचं केनेडी स्पेस सेंटर दुपारचे 12 वाजून 1 मिनिट, एक्सिओम-4 मिशनसाठी स्पेसएक्सचं 'ड्रॅगन' यान अंतराळात झेपावलं या यानाचे पायलट होते भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला. मात्र त्याचवेळी हजारो किलोमीटर अंतरावर मुलाच्या शाळेत बसून, अंतराळात झेपवणाऱ्या आपल्या मुलाला पाहून शुभांशू यांच्या आईच्या डोळ्यातून आनंदाअश्रू वाहू लागले.

ऍक्सिओम -4 मिशन हे भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण शुंभाशू शुक्ला हे अवकाशात स्थानकात जाणारे पहिले आणि राकेश शर्मांनंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरलेत. त्यामुळे अंतराळात गेल्यावर त्यांनी देशवासियांना काय संदेश दिलाय पाहूयात.

माझ्या प्रिय देशवासियांनो, What a ride...41 वर्षांनंतर आपण पुन्हा अंतराळात पोहोचलोय. कमाल राईड आहे. यावेळी आम्ही 7.5 किमी प्रतिसेकंद गतीनं पृथ्वीच्या भोवती फिरतोय. माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे. मी एकटा नाही, तुम्ही सगळे सोबत आहात हेच तो तिरंगा सांगतोय. माझ्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनपर्यंतच्या प्रवासाची सुरुवात नाही तर भारताच्या मानवासह स्पेस कार्यक्रमाची सुरुवात आहे. सर्व देशवासियांनी या प्रवासाचा हिस्सा बनावं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला गर्व असायला हवा. तुम्हीही तेवढाच उत्साह दाखवा. आपण सगळे मिळून भारताच्या मानवासह स्पेस प्रवासाची सुरुवात करु...जय हिंद, जय भारत

कोण आहेत शुभांशु शुक्ला?

शिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA)मधून पूर्ण

भारतीय हवाई दलातील एक अनुभवी फायटर पायलट

मिग-21 पासून ते सुखोईसारख्या अत्याधुनिक जेट विमानांना उडवण्याचा अनुभव

भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेचा एक भाग

गगनयान मोहिमेसाठी रशिया आणि अमेरिकेत विशेष प्रशिक्षण

भारताच्या अंतराळ संशोधनाला नवी दिशा

शुभांशु शुक्ला अंतराळात करणार 7 प्रयोग

सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात अंकुरांचे अंकुरणे, पिकांच्या बियाण्यांवर संशोधन

शेवाळावरील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण, किरणोत्सर्गाचा परिणामासारख्या संशोधन प्रकल्पांचा समावेश

स्नायूंच्या ऱ्हासाच्या कारणांचा अभ्यास आणि उपाय शोधण्यासाठी इन्सेटमचा प्रयोग

डिजिटल स्क्रीन्सवरील मानवी प्रतिक्रिया आणि तणाव पातळीचा अभ्यास

भारतीय अंतराळवीर शुंभाशु शुक्ला एक्सिओम-4 मिशनसाठी रवाना झाल्यानं भारतीयांसाठी हा नक्कीच ऐतिहासिक दिवस आहे. त्यांचा हा प्रवास भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राला एक नवा आत्मविश्वास देतोय. केवळ इस्रोच नव्हे, तर हवाई दल आणि संपूर्ण देशाच्या वैज्ञानिक यशाचा तो परिपाक आहे. त्यांच्या झेपेमुळे लाखो तरुणांना प्रेरणा मिळेल आणि भारताचं नाव पुन्हा एकदा जगाच्या अवकाश नकाशावर चमकणार हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमधील फर्निचर मार्केटजवळ इमारतीचा सज्जा कोसळला; एका कामगाराचा मृत्यू

Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? तर 'या' महत्वाच्या गोष्टी विसरु नका

Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या ४ किलोमीटरपर्यंत रांगा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येतील, एकमेकांना मिठ्या मारतील; शिंदेसेनेतील नेत्याचं मोठं वक्तव्य

Jalgaon News: जळगावमध्ये दोन साधूंना बेदम मारहाण; चारचाकी वाहनाचीही तोडफोड, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT