Shrikant Shinde Samvidhan Debate 
देश विदेश

Samvidhan Debate : बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव याच काँग्रेसनं केला; शिंदेंचा संसदेतून हल्लाबोल

Shrikant Shinde Samvidhan Debate : संसदेतील भाषणावेळी श्रीकांत शिंदे यांनी हल्ला

Namdeo Kumbhar

Parliament Winter Session News : शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोदार हल्लाबोल केला. संविधानावरील (Constitution debate) चर्चेवर बोलताना श्रीकांत शिंदेंनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने कायम बाबासाहेबांचा विरोध केला. संविधानाच्या नावाने यांनी फेक नरेटिव्ह चालवला.मतदारांनी काँग्रेसला ४०० वरून ४० वर आणले, असा टोला श्रीकांत शिंदेंनी उपस्थित केला. त्याशिवाय सावरकर प्रकरणावरूनही श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसला सवाल उपस्थित केला. यांनी संविधानाचा कव्हर असलेलं पुस्तक वाटले पण आत कोरी पाने होती. संविधान कोणाच्या राज्यात धोक्यात होत ? असेही श्रीकांत शिंदे म्हणाले.

श्रीकांत शिंदे यांच्या संसदेतील भाषणादरम्यान गदारोळ झाला. सगळ्यांना घरी बसवलं. मतदारांनी काँग्रेसला ४०० वरून ४० वर आणले, असा हल्लाबोल शिंदेंनी केला. राहुल गांधीजी तुमच्या आजी इंदिरा गांधी यांनी सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. त्यापण संविधान विरोधी होत्या का, असा सवाल श्रीकांत शिंदेंनी उपस्थित. सावरकरांचा अपमान ठाकरे गटाला मान्य आहे का? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केला.

आमच्या सरकारने OBC आयोगाला विशेष दर्जा दिला. आम्ही कलम ३७० हटवलं. यांनी धारावीचा मुद्दा मांडला. आम्ही धारावीचा पुनर्विकास करण्याची योजना सुरू केली. धारावीच्या लोकांना नवी आणि पक्की घर मिळणार आहेत. धारावीत दलीत, आदिवासी, मागासलेले लोक राहतात, मात्र त्यांना पक्की घरे देण्याला काँगेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचा विरोध आहे, असा हल्लाबोल श्रीकांत शिंदेंनी केला. मैं भारत का संविधान हुं... या कवितेच्या ओळी वाचत दाखवत श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेतील भाषण संपवलं.

राहुल गांधी काय म्हणाले ?

मी लहान असताना सावरकर यांच्याबाबत इंदिरा गांधी यांना प्रश्न विचारला होता. सावरकर यांनी माफी मागितली होती, हे त्यांनी मला सांगितलं. महात्मा गांधी जेलमध्ये गेले होते, सावरकर यांनी माफी मागितली होती, असे राहुल गांधी संसदेतील भाषणावेळी म्हणाले. संसदेत संविधानावरून चर्चा सुरू होती. या चर्चेवेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतली. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होम लोन, कार लोन झालं स्वस्त; नवरात्रीआधी 'या' बँकेने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

iPhone 17 Series launch: खास डिझाइन, आकर्षक फिचर्स, iPhone 17 आज येतोय, किंमत किती असणार? VIDEO

Kajal Aggarwal : काजल अग्रवालच्या मृत्यूची अफवा, नेमकं काय आहे सत्य?

Zilha Parishad School : झेडपीच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला, दौंडमधील मेमानवाडीच्या शाळेची जोरदार चर्चा, मुलं जर्मन बोलतात... वाचा

SCROLL FOR NEXT