Hindu Ekta Manch Mahapanchayat/ANI SAAM TV
देश विदेश

VIDEO : श्रद्धा वालकर घटनेच्या निषेधार्थ महापंचायत; महिलेनं धक्का देणाऱ्याला चपलेनं थोबडवलं

श्रद्धा वालकर हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ भरवलेल्या महापंचायतीत महिलेनं एका व्यक्तीला चपलेनं मारलं.

Nandkumar Joshi

Shraddha Walker Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या विरोधात हिंदू एकता मंचानं मंगळवारी महापंचायतीचं आयोजन केलं होतं. मात्र, या महापंचायतीत व्यासपीठावरच मारहाणीचा प्रकार घडला. एका महिलेनं व्यासपीठावर उपस्थित एका व्यक्तीला चपलेनं मारहाण केली. व्यासपीठावर उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानं प्रकरण निवळलं.

दिल्लीच्या छतरपूर परिसरात श्रद्धा वालकरला न्याय देण्याच्या मागणीसाठी हिंदू एकता मंचाने महापंचायतीचं आयोजन केलं होतं. आफताबनं ज्या परिसरात श्रद्धाची हत्या केली, त्याच परिसरात ही महापंचायत भरवली होती. बेटी बचाओ फाउंडेशननंही या महापंचायतीला समर्थन दिलं होतं. (Latest Marathi News)

महापंचायत सुरू असताना एक महिला आपली तक्रार घेऊन व्यासपीठावर आली. त्याचवेळी व्यासपीठावरील एका व्यक्तीनं तिला माईकपासून दूर करण्यासाठी धक्का मारला. त्यावर संताप अनावर झालेल्या महिलेनं त्या व्यक्तीला चपलेनं मारलं. त्याचवेळी तिथं उपस्थित अन्य लोकांनी मध्यस्थी केली. मारहाण करणाऱ्या महिलेला थांबवलं. (Crime News)

आफताबवर श्रद्धाच्या हत्येचा आरोप

आफताबनं १८ मे रोजी श्रद्धा वालकरची गळा आवळून हत्या केली होती, असा आरोप आहे. दोघांनी ८ मे रोजी दिल्लीच्या महरौली येथे फ्लॅट घेतला होता. तिथे ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्याआधी हे दोघेही मुंबईत राहायचे. १८ मे रोजी श्रद्धा आणि आफताबमध्ये भांडण झाले. त्यानंतर आफताबनं तिची हत्या केली.

आफताबनं तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. महरौली जंगलात रोज रात्री तो ते तुकडे फेकायचा. पोलिसांनी आफताबला १२ नोव्हेंबरला अटक केली होती. आफताब सध्या पोलीस कोठडीत असून, त्याची १ डिसेंबरला नार्को टेस्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT