Shraddha Walker Aftab Case SAAM TV
देश विदेश

Shraddha Walker-Aftab Case: श्रद्धा वालकर प्रकरणी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, तपास सीबीआयकडे सोपवणार?

श्रद्धा वालकर प्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत. मात्र, या तपासावर शंका उपस्थित करण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

Shraddha Walker-Aftab Case : दिल्लीच्या महरौलीमध्ये श्रद्धा वालकरची हत्या झाली. हे प्रकरण उघड झाल्यानंतर अवघा देश सुन्न झाला. आता हे प्रकरण हायकोर्टात पोहोचलंय. या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा दिल्ली पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, दिल्ली हायकोर्टातील वकिलांनी दिल्ली पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मीडिया ट्रायलचा आरोप केला आहे.

श्रद्धा वालकर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका वकिलाने हायकोर्टात केली आहे. या घटनेला सहा महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. या प्रकरणाचा खोलपर्यंत तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे पुरेसे स्त्रोत नाहीत. अशा वेळी हे प्रकरण तात्काळ दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवले पाहिजे, असे या वकिलांनी याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान, ही याचिका हायकोर्टानं दाखल करून घेतली आहे. (Latest Marathi News)

याचिकाकर्त्यानं दिल्ली पोलिसांवर (Police) गंभीर आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणातील संवेदनशील माहिती मीडियामध्ये देत आहेत, याशिवाय कोर्टाच्या सुनावणीची सविस्तर माहितीही सार्वजनिक केली जात आहे, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. या कृतीमुळं पुराव्यांसह साक्षीदारही प्रभावित होऊ शकतात, अशी शंकाही व्यक्त केली आहे.

ही घटना गंभीर आहे. तरीही दिल्ली पोलिसांनी या घटनेशी संबंधित ठिकाणे सील केलेली नाहीत. या ठिकाणांवर मीडियाचे प्रतिनिधी आणि सामान्य लोकांचा वावरही वाढला आहे. हे खूप बेजबाबदारपणाचे आहे, असेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

या घटनेतील महत्वाची माहिती सार्वजनिक केली जात आहे. याशिवाय फॉरेन्सिक पुरावे देखील सुरक्षित ठेवले जात नाहीत. अशा प्रकारच्या बेजबाबदार वृत्तीमुळे या प्रकरणात योग्य निकाल लागत नाही, असं सांगतानाच याचिकाकर्त्यानं एनसीआरबीच्या एका रिपोर्टचा उल्लेख केला आहे.

गंभीर प्रकारच्या घटनांमध्ये चुकीचा तपास किंवा अशा प्रकारे पुराव्यांशी छेडछाड झाल्यानं ही परिस्थिती उद्भवते. २०२१ मध्ये केवळ ४४ टक्के प्रकरणांमध्येच दोषींना शिक्षा झाली आहे, असंही याचिकेत नमूद केलं आहे.

आरोपी आफताब ५ दिवसांच्या कोठडीत

आरोपी आफताब पूनावाला याने याचवर्षी १८ मे रोजी श्रद्धा वालकरची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून महरौलीच्या जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी ते फेकून दिले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये आरोपीला अटक केली होती. सध्या तो पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. या कालावधीत त्याची नार्को चाचणी करण्यास कोर्टाने मंजुरी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : धनलाभ होणार, हातात पैसा खेळता राहणार; 5 राशींच्या लोकांना बंपर लॉटरी लागणार

Maharashtra Politics : मी स्टार प्रचारक, खर्चाची अजिबात चिंता करू नका; ऐन निवडणुकीत भाजप नेत्याचं वक्तव्य, चर्चांना उधाण

Terror Attack: पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध कट; ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी पुन्हा सक्रिय

Murmura Chivda Recipe: घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिवडा, चवीला होईल सर्वात भारी

Maharashtra Live News Update: दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी विट्यात निघाला कॅन्डल मार्च

SCROLL FOR NEXT