Shopian Encounter PTI
देश विदेश

Shopian Encounter : जय जवान! जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई, एन्काउंटरमध्ये 'लश्कर'च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir encounter today : शोपियांमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. दहशतवादी आणि जवानांमधील चकमकीत लश्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं.

Nandkumar Joshi

जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली. रिपोर्ट्सनुसार, लश्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असून, शोधमोहीम सुरूच आहे.

जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. भारतीय जवानांनी लश्कर ए तोयबाच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. त्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले. परिसरात सर्च ऑपरेशन अद्यापही सुरूच आहे. पहलगाम हल्ल्याशी या दहशतवाद्यांचा संबंध आहे की नाही याबाबत नेमकी माहिती कळू शकलेली नाही.

अधिकाऱ्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या शुकरू केलर परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. परिसराला घेराव घातला. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांच्या गोळीबाराला जवानांनी प्रत्युत्तर दिले. यात लश्करच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

लश्करच्या कमांडरलाच टिपलं

स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली. जवानांनी लश्कर ए तोयबाच्या कमांडरलाच टिपले. त्याच्यासह तिघा दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून निर्दयीपणे त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर सतर्क असून, दक्षिण काश्मीरच्या किश्तवाडच्या जंगलात शोधमोहीम सुरू आहे. आज, मंगळवारी सकाळपासूनच शोधमोहीम सुरू झाली होती. शोपियांमध्ये शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले. चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT