Viral News Saam Tv
देश विदेश

Viral News: वह स्त्री है, वह कुछ भी कर सकती है... महिलेने स्कुटी थेट मोमोजच्या गाड्यावर घातली, घटना सीसीटीव्हीत कैद!

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक जगभरातील घडलेल्या घटना पाहण्यास मिळतात. कधी कुठे आनंदायी घटना घडतात तर कुठे अक्षरशा: रडवून टाकणाऱ्या घटना घडतात. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कधी तरी व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे घडणारे अपघात असतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. ज्यात एक महिलेच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडलेला आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला दिसेल की, एक रस्त्याच्या कडेला मॉमोजच्या गाडीही आहे. या मॉमोजच्या गाडीवर काही व्यक्ती दिसून येत आहे. जे मॉमोज घेण्यासाठी थांबलेले आहेत. मात्र व्हिडिओत पुढे तुम्ही पाहिले तर दिसेल की, एक रस्त्याकडेला स्कूटीवर महिला आहे, जी काही वेळात मॉमोजच्या गाडीवर थेट तिच्याकडून गाडी घुसवली जाते. संपूर्ण घटना दुकानाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झालेली आहे.

व्हायरल सीसीटीव्ही फूटेज इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरील ''@sach_bedhadak'' या अकाउंटवर शेअर केलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''छत्तीसगढ़ एक महिला स्कूटी चालते हुए मोमोज की दुकान में घुसली. त्यानंतर सर्व दुकानात असलेले ग्राहक आणि लहान मुलं तिकडून पळून गेली शिवाय संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कैद झाला'' असे लिहिण्यात आलेले आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या नजरेत आलेला आहे. आतापर्यंत व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत असून मोठ्या संख्येने लाईक्स मिळत आहे. व्हिडिओ पाहून प्रत्येक यूजर्संनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' देवा नशिब मोठा अपघात झालेला नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' तरुणींना मोमोज खूप आवडतात त्यामुळे ते मोमोजच्या दुकानात थेट शिरली'' अशा अनेक प्रतिक्रिया व्हायरल व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT