धक्कादायक ! आंध्रप्रदेशात ३०० भटक्या कुत्र्यांचा अचानक मृत्यू  Twitter/@ANI
देश विदेश

धक्कादायक ! आंध्रप्रदेशात ३०० भटक्या कुत्र्यांचा अचानक मृत्यू

गावपंचायतीने विषारी इंजेक्शन देऊन मारल्याचा संशय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था

आंध्र प्रदेशच्या (AndharPradesh) पश्चिम गोदावरी जिल्ह्यात 300 हून अधिक भटक्या कुत्र्यांचा अचानक मृत्यू (More than 300 stray dogs die) झाला. गावातील पंचायतीने या कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात लिंगापलेम गावात (Lingapalem village) कुत्र्यांचे मृतदेह पुरताना ही बाब समोर आली आहे. प्राणीप्रेमी कार्यकर्ते चल्लाप्पाल्ली श्रीलथा यांनी या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. (Shocking! Sudden death of 300 stray dogs)

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पश्चिम गोदावरीचे जिल्हाधिकारी कार्तिकेय मिश्रा यांनी शुक्रवारी भटक्या कुत्र्यांच्या हत्येच्या चौकशीचे आदेश दिले. लिंगापालेम पंचायत सचिव सुगनराज यांच्या म्हणण्यानुसार, काही स्थानिक लोकांनी रात्री उशिरा त्यांना एका भटक्या कुत्र्याचे मृतदेह खड्ड्यात पुरताना पाहिले होते. त्यानंतर त्यांनी तत्काळ धर्मजीगुडेम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याबाबत प्राणीप्रेमी कार्यकर्ते चल्लाप्पाल्ली श्रीलथा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भटक्या कुत्र्यांना संपवण्यासाठी गावातील काही लोकांनी कुत्रा पकडणारे नेमले असावेत. या प्रक्रियेत काही पिल्लेही मारली गेली. या क्रूर कृत्यामध्ये पंचायत सरपंच आणि त्यांच्या साथीदारांचा सहभाग असल्याचा आम्हाला संशय आहे. पंचायत सचिव आणि सरपंचाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तथापि पोलिस सुरुवातीला तक्रार नोंदवण्यात संकोच करत होते. नंतर समजूत काढल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्राणी हक्क कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी आणि एसपी यांनाही या प्रकरणाची माहिती दिली. श्रीलथा यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे लिंगापलेम पंचायत सचिव आणि सरपंच यांच्याविरोधात क्रूरता प्रतिबंधक प्राणी अधिनियम कायद्यांर्तगत प्राण्याला विष देणे या कलमाखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

SCROLL FOR NEXT