बापरे! 200 फूट उंच टॉवरवर चक्क 135 दिवस राहिला तरुण

ऊन, कडक उष्मा आणि मुसळधार पाऊस असूनही हा तरुण टॉवरवरून खाली उतरला नाही. या दरम्यान, पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या तरुणाला टॉवरवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, पण अट पूर्ण होईपर्यंत त्याने टॉवरवरून खाली येण्यास नकार दिला.
बापरे! 200 फूट उंच टॉवरवर चक्क 135 दिवस राहिला तरुण
बापरे! 200 फूट उंच टॉवरवर चक्क 135 दिवस राहिला तरुणSaam Tv
Published On

पंजाब : पंजाबच्या Punjab गुरदासपूरमध्ये एक तरुण 200 फूट उंच टॉवरवर 135 दिवस जगला आहे. ऊन, कडक उष्मा आणि मुसळधार पाऊस असूनही हा तरुण टॉवरवरून खाली उतरला नाही. या दरम्यान, पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या तरुणाला टॉवरवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, पण अट पूर्ण होईपर्यंत त्याने टॉवरवरून खाली येण्यास नकार दिला.

सुरिंदर पाल सिंग असे 135 दिवस मोबाईल टॉवरवर वेळ घालवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ईटीटी टीईटी उत्तीर्ण झाल्यानंतर सुरिंदर शिक्षक भरती प्रक्रियेची वाट पाहत होता, परंतु रिक्त जागा बराच काळ भरल्या गेल्या नाहीत. म्हणून त्याचे धाडस उत्तर देऊ लागले.

हे देखील पहा-

बेरोजगारीमुळे तो इतका अस्वस्थ झाला की, त्यांनी सरकारच्या विरोधात अनोखे आंदोलन सुरू केले. सुरिंदर पाल सिंह गुरदासपूरमध्ये असलेल्या मोबाइल टॉवरवर चढले. या संघर्षात मोठ्या संख्येने बेरोजगार ETT TET पास उमेदवारांनी त्याला साथ दिली.

आंदोलनाचे फळ मिळाले - सुरिंदर पाल सिंह यांचा आग्रह आणि ईटीटी टीईटी पास उमेदवारांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि सरकारने 6600 नवीन भरती जाहीर केल्या. सुरिंदर पाल यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांना भरपूर आनंद झाला.

बापरे! 200 फूट उंच टॉवरवर चक्क 135 दिवस राहिला तरुण
चार पाच तास एकच काम! नवऱ्याच्या अजब व्यसनामुळे बायको हैराण

शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्याची बातमी मिळाल्यानंतर सुरिंदर पाल सिंह यांना टॉवरवरून खाली आणण्यात आले. मात्र, टॉवरवर चार महिन्यांहून अधिक काळ घालवल्यानंतर त्याची प्रकृती खालावली होती. सुरिंदरपाल सिंग यांची त्वचा जळाली होती आणि ते आपल्या पायावर व्यवस्थित उभे राहू शकत नव्हते.

घटनास्थळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावली. सुरिंदर पाल सिंह यांना रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com