9-Month-Old Baby Falls From Seemanchal Express AI Image
देश विदेश

Shocking : धक्कादायक! ९ महिन्याचं बाळ धावत्या एक्सप्रेसच्या खिडकीतून पडले, नंतर जे घडलं त्याने काळजाचा ठोका चुकला

Seemanchal Express Tragedy News : सीमांचल एक्स्प्रेसमधून ९ महिन्यांचे बाळ आपत्कालीन खिडकीतून खाली पडले. फैजुल्लाहपूरजवळ २३ तासांच्या शोधानंतर झुडपांमध्ये बाळाचा मृतदेह आढळला.

Alisha Khedekar

  • सीमांचल एक्स्प्रेसमध्ये ९ महिन्यांचे बाळ धावत्या रेल्वेतून खाली पडले

  • आई बाळाला दूध पाजत असताना तिला झोप लागल्याचे पोलिसांच्या तपासात समोर

  • झुडपांमध्ये बाळाचा मृतदेह आढळला

  • २३ तासांच्या शोधमोहीमेनंतर आढळला मृतदेह

रेल्वेतून प्रवास करताना लहान प्रवाशांनी हात, डोके बाहेर काढू नये, तसेच पालकांनी निष्काळजीपणा न करता आपल्या लहान मुलांना खिडकीपासून दूर ठेवावे असे वारंवार सांगितले जाते. असे असतानाही एका आईच्या निष्काळजीपणामुळे ९ महिन्यांच्या बाळाला जिम गमवावा लागला. दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या सीमांचल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. आईच्या कुशीत दूध पित असताना झोप लागल्याने नऊ महिन्यांचे बाळ तिच्या हातातून निसटले आणि धावत्या रेल्वेच्या आपत्कालीन खिडकीतून खाली पडले. उत्तर प्रदेशातील फैजुल्लाहपूर रेल्वे स्थानकाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. तब्बल २३ तासांच्या शोधानंतर बाळाचा मृतदेह झुडपांमध्ये आढळून आला.

दिल्लीतील सितापुरी परिसरात राहणारे मोहन कुमार हे पत्नी काजल आणि नऊ महिन्यांच्या मुलासोबत बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील सालौना गावाकडे निघाले होते. कुटुंब आनंद विहारहून सीमांचल एक्स्प्रेसच्या S-1 डब्यातून प्रवास करत होते. त्यांना 61 आणि 64 क्रमांकाच्या बर्थ मिळाल्या होत्या. पोलिसांच्या तपासानुसार, मोहन हे शौचालयात गेले असताना काजल मुलाला दूध पाजत होती. त्याचदरम्यान तिला झोप लागली आणि तिच्या कुशीत असलेले बाळ मागे सरकून आपत्कालीन खिडकीतून बाहेर पडले.

मोहन परतल्यानंतर मुलगा दिसत नसल्याने दोघांनी डब्यात शोधाशोध केली. मात्र, बाळाचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. मुलगा धावत्या रेल्वेतून खाली पडल्याची शक्यता लक्षात आल्यानंतर मोहन यांनी आपत्कालीन साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही प्रवासी आणि रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले.

प्रयागराज येथे पोहोचल्यानंतर दांपत्याने GRPला घटनेची माहिती दिली. त्यानंतर GRP आणि RPFच्या पथकाने रेल्वे मार्गालगत शोधमोहीम सुरू केली. रात्रभर शोध घेतल्यानंतर फैजुल्लाहपूर स्थानकाजवळील झुडपांमध्ये शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बाळाचा मृतदेह आढळला. दाट झाडी आणि पाणी साचल्यामुळे शोधमोहीम कठीण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचेही समोर आले. मृतदेह सापडल्यानंतर शवविच्छेदनाला झालेल्या विलंबामुळे आई-वडिलांना रात्री स्थानकावरच थांबावे लागले. या प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

"मेंटेनन्स देणार नाही, काय करायचं ते करा" असं म्हणणाऱ्या फ्लॅटधारकांना झटका; सोसायटी करू शकते 'ही' कडक कायदेशीर कारवाई

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

तळलेले की उकडीचे? गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणते मोदक बेस्ट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT