UK Adult Content Creator Bonnie Blue Saam Tv
देश विदेश

Shocking: १२ तासांत १००० हून अधिक पुरूषांसोबत लैंगिक संबंध, महिलेविरोधात मोठी कारवाई, थेट...

UK Adult Content Creator Bonnie Blue: ब्रिटनच्या एडल्ट कंटेन्ट क्रिएटर बोनी ब्लू पुन्हा वादात सापडली आहे. बोनी ब्लूविरोधात इंडोनेशिया पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तिला इंडोनेशियामध्ये प्रवेश करण्यास १० वर्षांसाठी बंदी घालण्यात आली.

Priya More

Summary -

  • ब्रिटनची एडल्ट कंटेंट क्रिएटर बोनी ब्लू पुन्हा चर्चेत

  • बोनी ब्लूविरोधात इंडोनेशियाने मोठी कारवाई केली

  • बालीमध्ये कंटेंट शूट केल्याच्या आरोपानंतर पोलिसांची कारवाई

  • १० वर्षांसाठी इंडोनेशियात प्रवेशावर बंदी

ब्रिटनची वादग्रस्त एडल्ट कंटेट क्रिएटर बॉनी ब्लू उर्फ टिया बिलिंगर पुन्हा चर्चेत आली आहे. बोनी ब्लूवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंडोनेशियाने बोनी ब्लूला बालीमधून हद्दपार केले आहे. तिला १० वर्षांसाठी इंडोनेशियामध्ये पुन्हा प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. या कारवाईमुळे बोनी ब्लू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

२०२५ हे वर्ष सुरू झाल्यानंतर बोनी ब्लूने १२ तासांत १,०५७ पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. बोनी ब्लूने इतक्या पुरूषांसोबत लैंगिक संबंध ठेवत जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा केला होता. तिने दावा केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती आणि नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या होत्या.

इंडोनेशियातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बाली येथे बोनी ब्लू निळ्या रंगाच्या पिकअप ट्रकमध्ये फिरत असताना एडल्टसाठी कंटेंट शूट करत असल्याचा आरोप आहे. एका 'जबाबदार नागरिकाच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी एका स्टुडिओवर छापा टाकला जिथे बोनीसोबत इतर तीन पुरुष - दोन ब्रिटिश आणि एक ऑस्ट्रेलियन एकत्र आढळून आले. सुरुवातीला बोनी ब्लूविरोधात इंडोनेशियाच्या कठोर पोर्नोग्राफी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये १५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठ्या दंड ठोठावला जाऊ शकतो.

तपासात बोनी ब्लूविरुद्ध पोर्नोग्राफीमध्ये सहभागाचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत. त्यानंतर हा खटला पर्यटक व्हिसाचा गैरवापर आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यापर्यंत मर्यादित करण्यात आला. तिच्यावर परवान्याशिवाय वाहन चालवणे आणि तिचे वाहन नोंदणी न करणे असा आरोप करण्यात आला. न्यायालयाने तिला एक छोटासा दंड ठोठावला आणि हद्दपारीचे आदेश दिले. इमिग्रेशन प्रमुख हेरू विनार्को यांनी सांगितले की, बोनी सुट्टीसाठी आली होती परंतु तिने तिच्या व्हिसा अटींचे उल्लंघन केले. बोनी कोर्टातून बाहेर पडताना हसत आणि कॅमेऱ्यांसमोर किस घेताना दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बारामतीत NDRF टीम दाखल; घटनास्थळी करणार पाहणी

Arijit Singh: 'बॉर्डर २'मुळे अरिजीत सिंगने सोडलं प्लेबॅक सिंगिंग; प्रसिद्ध निर्मात्याने सांगितलं खरं कारण

India Tourism : 'या' शहराला भारताचे पॅरिस म्हटले जाते, एकदा जाऊन नक्कीच भेट द्या

VSR Ventures: अपघातग्रस्त विमानाचे झाले होते दोन तुकडे, मग पुन्हा परवानगी कुणी दिली? कंपनीवर प्रश्नचिन्ह

Trending Mangalsutra Designs: महिलांना आवडणाऱ्या मंगळसूत्राच्या ट्रेडिंग्स 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT