kerala  Saam tv
देश विदेश

Kerala Employees : कर्मचाऱ्यानं टार्गेट पूर्ण केलं नाही; मॅनेजरने कुत्र्यासारखं गळ्यात पट्टा घालून फिरवलं, संतापजनक VIDEO

kerala employees news : केरळमधील एका फर्मवर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...या फर्ममधील वाईट कामगिरी करणाऱ्या कर्मचार्‍यांना अमानूष शिक्षा दिली आहे. नेमकं काय घडलंय...पाहूया एक रिपोर्ट...

Snehil Shivaji

ही दृष्य पाहिल्यावर तुम्ही विचार करत असाल माणसांसारखी माणसं अशी कुत्र्यासारखे चाळे का करतायेत.. . हे नेमकं काय सुरुये असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. आता आम्ही जे पुढे सांगणार आहोत ते ऐकून तुमचा संताप अनावर होईल.. जर तुम्ही शीघ्रकोपी असाल तर मात्र टिव्ही बंद करा.. कारण आता आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत ते ऐकून तुमचा संताप अनावर होईल.. होय.. संताप अनावरच होईल..

कारण या होतकरु गरजू तरुणांनी केलेले हे चाळे यांना करायला भाग पाडलंय त्यांच्या मॅनेजरनं.. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या गरजूगरीबांना केवळ कामातील टार्गेट पूर्ण झालं नाही म्हणून त्यांना ही जालीम शिक्षा देण्यात आलीये. होय केवळ टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून या ४-५ तरुणांना अशी अमानुष शिक्षा देण्यात आलीये.

अमानवी शिक्षा काय दिली ?

मॅनेजरने कर्मचाऱ्यासारंख कुत्र्यासारखं गळ्यात पट्टा घालून फिरवलं. कुत्र्यासारखं पाणी चाटायला लावलं. तसेच कर्मचाऱ्याला अर्धनग्न उभं केलं. माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडून या मॅनेजरनं या तरुणांना दिलेल्या शिक्षेचा हा व्हिडीओ पाहून सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. केरळमध्ये घडलेला हा प्रकार धक्कादायक आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांचा असा अमानुष शारीरिक आणि मानसिक छळ करण्याचा अधिकार या जल्लादांना कोणी दिला असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे शिक्षा जरी या 4-5 तरुणांना झालेली तरी हा भयंकर व्हिडीओ पाहुन सगळेच सुन्न झालेत. कारण वरवर अलिशान वाटणाऱ्या कॉर्पोरेटचा हा काळा चेहरा या निमित्तानं समोर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: अजित पवारांच्या आमदाराकडून काँग्रेसचा प्रचार, महायुतीतील संघर्ष टोकाला

Chanakya niti: दुपारच्या वेळेस का झोपू नये? चाणक्यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Maharashtra Politics: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे माझं सँडविच होतं, रक्षा खडसे असं का म्हणाल्या?

Viral Video : गाड्या अडवल्या, बोनेटवर बसून धिंगाणा घातला; साताऱ्यात मद्यपी तरुणीचा धिंगाणा, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT