indian software engineer killed in canada mall Saam Tv
देश विदेश

Shocking: भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअरची कॅनडामध्ये हत्या, शॉपिंग मॉलमध्ये गोळ्या झाडून संपवलं

indian software engineer killed in canada mall: कॅनडामध्ये भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा तरुणी एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होत्या. हत्येमागचे कारण समोर आले नाही.

Priya More

Summary -

  • कॅनडामधील शॉपिंग मॉलमध्ये भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या

  • मृत तरुण कर्नाटकातील सॉफ्टवेअर इंजिनीअर होता

  • हत्येमागचं कारण अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे

  • अद्याप आरोपीला अटक करण्यात आले नाही

कॅनडामध्ये एका भारतीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. टोरंटोमध्ये कर्नाटकातील एका ३७ वर्षीय भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या करण्यात आली. शनिवारी दुपारी शॉपिंग मॉलमध्ये गोळ्या झाडून त्याला संपवण्यात आले. हल्लेखोराने भारतीय तरुणावर अनेक गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या हत्याकांडामुळे कॅनडामधील भारतीय नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदन कुमार राजा नंदकुमार असं हत्या करण्यात आलेल्याल्या तरुण व्यावसायिकाचे नाव होते.तो ग्रेटर टोरंटो क्षेत्रातील ब्रॅम्प्टनचा रहिवासी होता. तो मूळचा कर्नाटकातील बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील नेलामंगला जवळील थायमागोंडलू गावचा रहिवासी होता. चंदन गेल्या ६ वर्षांपासून कॅनडामध्ये राहत होता आणि एल अँड टीची उपकंपनी असलेल्या एलटीआय माइंडट्रीमध्ये काम करत होता. तो याआधी बंगळुरूमध्ये कॉग्निझंटमध्ये काम करत होता.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. वुडबाईन शॉपिंग सेंटरच्या प्रवेशद्वाराजवळ हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला तेव्हा चंदन त्यांच्या कारमध्ये बसले होते. चंदनला अनेक गोळ्या लागल्या होत्या. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये चंदनच्या पांढऱ्या रंगाच्या कारवर अनेक गोळ्या झाडलेल्या दिसत आहे.

या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. बंगळुरूतील थायमागोंडलू गावामध्ये राहणाऱ्या चंदनच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. आपल्या एकुलत्या एका मुलाची हत्या करण्यात आल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. चंदनचे वडील नंदकुमार यांनी सांगितले की, 'आम्ही गेल्या शुक्रवारी त्याच्याशी बोललो. तो म्हणाला की तो या उन्हाळ्यात सुट्टी घेऊन घरी येईल. आम्ही त्याच्या लग्नाचे नियोजन करत होतो. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो. चंदनने भारतात येण्याचा त्याचा प्लान पुढे ढकलला होता. जर त्याने आमचे ऐकले असते आणि भारतात परतला असता तर तो आज आपल्यासोबत असता.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips : ज्योतिषशास्त्रानुसार रात्रीच्या वेळेस परफ्यूम का लावू नये? जाणून घ्या कारण

Valentine Day 2026 : तुमच्या मनातलं प्रेम 'तिला'ही कळू दे; रोमँटिक शायरीने करा प्रपोज, गर्लफ्रेंड होईल खुश

Maharashtra Live News Update: शरद पवार यांच्या तब्येतीत सुधारणा

Cholesterol: LDL कोलेस्ट्रॉलपेक्षाही घातक आहे 'हा' घटक, हार्ट अटॅकचा धोका ओळखण्यासाठी नवीन पद्धत, वाचा डॉक्टरांनी काय सांगितले

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! ट्रक आणि डिझेल टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT