AAP Announced Candidate  ANI
देश विदेश

AAP: इंडिया आघाडीला धक्का; गुजरात लोकसभेसाठी उमेदवार देण्यात आपची आघाडी

Lok Sabha Election : गुजरातच्या भरुच लोकसभा मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडणूक लढवणार याची घोषणा केलीय. अरविंद केजरीवाल हे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत, त्यादरम्यान सभेतून केजरीवालांनी उमेदवाराची घोषणा केली.

Bharat Jadhav

(प्रमोद जगताप)

AAP Announced Candidate For Gujarat Lok Sabha Election:

इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये एकमत नसल्याचं दिसून येत आहे. इंडिया आघाडीच्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहे. युपीमध्ये काँग्रेसला ४० जागा हव्या. पण त्यासाठी सपा तयार नाही. उत्तर प्रदेशातील जागा वाटपाचा निकाल लागण्याआधीच आम आदमी पक्षाने उमेदवारांची घोषणा करण्यात आघाडी घेतलीय. (Latest News)

आपने गुजरात लोकसभेसाठी (Loksabha) आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केलीय. गुजरातच्या भरुच लोकसभा मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडणूक लढवणार याची घोषणा केलीय. अरविंद केजरीवाल हे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत, त्यादरम्यान सभेतून केजरीवालांनी उमेदवाराची घोषणा केली. गुजरातच्या भरुच लोकसभा मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडणूक लढवणार याची घोषणा केलीय.

चैतर वसावा हे भरुच लोकसभा मतदारसंघातून लढवतील अशी घोषणा आपकडून करण्यात आलीय. दरम्यान चैतर वसावा हे सध्या वनविभागातील कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी तुरुंगात आहेत. एकीकडे इंडिया आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुरू असताना दुसरीकडं केजरीवालांनी मात्र आपला उमेदवार घोषित केलाय.

कोण आहेत चैतर वसावा

गुजरात दौऱ्यावर असलेले अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भरूचमधील नेतरंग येथील आदिवासींच्या मेळाव्याला संबोधित केलं. येथील आदिवासी समुदायाला भाजपचा बदला घेण्याचा आवाहन केलं. दरम्यान सभेच्यावेळी डेडियापाडा तुरुंगात असलेले आप आमदार चैतर वसावा यांच्या कुटुंब केजरीवाल यांच्यासोबत मंचावर उपस्थित होते. यावेळी केजरीवाल म्हणाले, “त्यांनी तुमच्या मुलाला,आदिवासी समाजाचे नेते चैतर वसावा यांना अटक केलीय. तो आमचा धाकटा भाऊ आहे, आप हा एक परिवार आहे. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे चैतर वसावा यांची पत्नी शकुंतला बेन यांनाही अटक केलीय.

त्यांनी आमच्या सुनेला अटक केली. या अपमानाचा बदला घेणार की नाही? भाजपचे लोक डाकूंपेक्षाही वाईट आहेत. गप्प बसू नकोस, बदला घे." वसावा हे डेडियापाडा विधानसभा (Assembly) मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) आमदार आहेत. जानेवारी २०२३ मध्ये त्यांची गुजरात विधानसभेत आपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT