Bengaluru News saam tv
देश विदेश

Bengaluru News: 'मी दहशतवादी आहे...'असं म्हणत इंजिनीअर विद्यार्थ्याचा विमानतळावर गोंधळ; कारण ऐकून सगळेच चक्रावले

Shocking News: बगंळूरुमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. वडिलांच्या ओरडण्याच्या भीतीपासून वाचण्यासाठी तरुणाने चक्क विमानात स्वत:ला दहशतवादी असल्याचे सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bengaluru Airport News

बगंळूरुमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. वडिलांच्या ओरडण्याच्या भीतीपासून वाचण्यासाठी तरुणाने चक्क विमानात स्वत:ला दहशतवादी असल्याचे सांगितले आहे. याने बगंळूरु विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर पोलिसांनी विमानतळावर तात्काळ त्या विद्यार्थ्याला अटक केली गेली. सध्या सोशल मीडियावर या पोस्टची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, बगंळूरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही विचित्र घटना घडली असून बगंळूरु येथून लखनौला जाणाऱ्या विमानात हा तरुण प्रवास करत होता. आदर्श कुमार असे या तरुणाचे नाव असून तो लखनऊचा रहिवासी आहे आणि एका खासगी अभियांत्रिकी ( engineering) महाविद्यालयात बी.टेक.च्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.

दहशतवादी असल्याचे वनाव...

स्वत:ला दहशतवादी असल्याचे ओरडून सांगितल्यानंतर विमानातील क्रु मेंबर घाबरुन गेले. यानंतर क्रु मेंबरने तात्काळ याची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली. सुरक्षा यंत्रणांनी विमानात पोहचून तरुणाला ताब्यात घेतले. ही विचित्र घटना (ता.१७)फेब्रुवारीच्या साधारण रात्री घडली. त्याला त्यावेळी पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत अटक केली तसेच त्यानंतर त्याची कठोर चौकशी करण्यात आली.

या चौकशीत धक्कादायक अशी माहिती मिळली मात्र याचे कारण पाहून तुम्हीही तुमच्या डोक्याला हात मारल्याशिवाय राहणार नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

वडिलांची भीती...

आदर्श हा अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.टेक.च्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून अभ्यासात कमकुवत होता मात्र त्याची इच्छा नसतानाही त्याच्या वडिलांनी त्याला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. मनाविरुद्धात प्रवेश केल्याने आदर्शचा पहिल्या वर्षाचा निकाल खराब आला होता त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला घरी बोलावून घेतले होते.

वडिलांनी घरी बोलवण्यानंतर त्याला वडिलांची खूप भीती होती कारण घरी पोहचल्यानंतर वडील ओरडतील. मात्र आपण घरी जाण्यासाठी निघालो तर होतो पण घर न जाण्यासाठी त्याने विमानातून उतरण्याचा असा विचित्र पर्याय शोधून काढला यासाठी त्याने विमान टेक ऑफच्या काही मिनिटांपूर्वी आपण दहशतवादी असल्याचं ओरडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT