मुंबई विमानतळावर एका ८० वर्षीय वृद्धाचा व्हिलचेअर अभावी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. मृत व्यक्ती भारतीय वंशाची असून अमेरिकन नागरिक होती. हे वृध्द गृहस्थ व्हिलचेअर न मिळाल्याने इमिग्रेशन भागात पोहोचण्यासाठी चालत गेले. इमिग्रेशन भागात पोहोचण्याआधीच ते अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार,वृद्ध दाम्पत्य हे अनिवासी भारतीय आणि अमेरिकन नागरिक होते.भारतात येण्यासाठी हे दाम्पत्य न्यूयॉर्कमधून रवाना झाले. यांनी भारतात येण्यापूर्वीच व्हिलचेअरची सुविधा आधीपासूनच बुक केली होती.ते येत असलेल्या विमानामध्ये ३२ व्हिलचेअर प्रवासी होते मात्र मुंबई विमानतळावर केवळ १५ व्हिलचेअरच उपलब्ध होत्या मात्र विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पत्नीला व्हीलचेअर मिळाली, मात्र ८० वर्षीय व्यक्तींना व्हीलचेअर मिळू शकली नाही.
व्हिलचेअर मिळू न शकल्यामुळे विमानतळावर या जोडप्यांसाठी केवळ व्हिलचेअर असिस्टंट तिथे आला. काहीवेळ थांबल्यानंतर त्यांनी पायी जायचा निर्णय घेतला. या वृद्ध व्यक्तीची पत्नी त्या व्हिलचेअरवर बसली आणि ८० वर्षीय गृहस्थ त्यांच्यामागून चालू लागले. काही वेळानंतर चालत जात असताना ८० वर्षीय गृहस्थ इमिग्रेशन काऊंटरजवळ कोसळले.
जमिनीवर कोसळ्यानंतर त्यांना तातडीने विमानतळावरील वैद्यकीय कक्षात नेण्यात आले पंरतू डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांना तिथून नानावटी रुग्णालयात दाखल केले मात्र यामध्येच त्यांचा हदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
एअक इंडियाच्या प्रवक्याचे स्पष्टीकरण...
व्हिलचेअरच्या अधिक मागणीमुळे व्हिलचेअर असिस्टंट मिळेपर्यंत वाट पाहण्याची आम्ही त्यांना विनंती केली होती.मात्र त्यांनी आपल्या पत्नीसह चालत जाण्याचा पर्याय निवडला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.