Hair Transplant Vineet Dubey Death Saam Tv
देश विदेश

हेअर ट्रान्सप्लांट करणारी डॉक्टर होती डेंटिस्ट, इंजिनिअर तरुणाच्या मृत्यूनंतर नवी माहिती समोर

Hair Transplant Vineet Dubey Death : हेअर ट्रान्सप्लांट दरम्यान निष्काळजीपणामुळे इंजिनीअर तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर क्लिनिक बंद करुन डॉक्टर पळाली. या डॉक्टरच्या डिग्रीवर शंका उपस्थित केली जात आहे.

Yash Shirke

हेअर ट्रान्सप्लांट करताना सहायक इंजिनिअर विनीत दुबे यांचा मृत्यू झाला. ते कानपूरच्या पनकी पॉवर हाऊसमध्ये कार्यरत होते. १३ मार्च रोजी खासगी क्लिनीकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करताना ही घटना घडली. १५ मार्च रोजी विनीत यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टरांच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विनीत यांच्यावर हेअर ट्रान्सप्लांट करणारी डॉक्टर अनुष्का तिवारी डेंटिस्ट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

डॉ. अनुष्का तिवारी यांनी ज्या क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया केली ते आता बंद आहे. डॉ. तिवारी सध्या बेपत्ता आहे. त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली होती. पण त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. याच दरम्यान डॉ. अनुष्का तिवारी यांच्या पदवीबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या क्लिनिकच्या बाहेरून हेअर ट्रान्सप्लांट हा बोर्डही काढून टाकण्यात आला आहे. याआधी बोर्डवर डेंटल, हेअर आणि एस्थेटिक्स असे लिहिलेले होते.

विनित दुबे यांच्या पत्नी जया दुबे यांनी रावतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 'जेव्हा विनित हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी गेले होते. तेव्हा जया माहेरी गेल्या होत्या. डॉ. अनुष्का तिवारी यांच्या क्लिनिकमध्ये माझे पती हेअर ट्रान्सप्लांटसाठी गेले होते. तेव्हा इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा चेहरा सुजला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. संसर्ग वाढल्याने १५ मार्च रोजी त्यांचे निधन झाले', अशी माहिती जया यांनी दिली.

जया दुबे म्हणाल्या, माझ्या पतीचा मृत्यू चुकीच्या उपचारांमुळे आणि निष्काळजीपणामुळे झाला. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर मी मुख्यमंत्री पोर्टवर तक्रार केली, तेव्हा ९ मे रोजी पोलिसांनी रावतपूर पोलीस ठाण्यात डॉ. अनुष्का तिवारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. माझ्या पतीने हेअर ट्रान्सप्लांटची संपूर्ण फी भरली होती, तरीही डॉक्टरांनी निष्काळजीपण केला. ज्याने माझ्या पतीचा मृच्यू झाला. त्या डॉक्टरवर कठोर कारवाई करण्यात यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT