Charlotte train tragedy: Ukrainian woman stabbed to death after escaping war. saam tv
देश विदेश

Woman Stabbed to Death: युद्धातून जीव वाचवून अमेरिकेत आली; ट्रेनमध्ये हल्लेखोराने चाकू भोसकला Video Viral

Ukrainian Refugee Woman Stabbed to Death: एका युक्रेनियन निर्वासित तरुणीची एका हल्लेखोराने चाकू भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक घडलीय. अमेरिकेच्या ट्रेनमधील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

  • युक्रेन युद्धातून जीव वाचवून महिला अमेरिकेत आली होती.

  • शार्लट लाईट रेल्वे ट्रेनमध्ये तिच्यावर चाकू हल्ला झाला.

  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

रशिया आणि युक्रेनमध्ये धमासान युद्ध सुरू आहे. युद्धामुळे युक्रेनमधील नागरिक स्थलांतर करत आहेत. युद्धातून जीव वाचवण्यासाठी तेथील लोक दुसऱ्या देशात आश्रय घेत आहेत. अशीच एक महिला आपला जीव वाचवत अमेरिकेत आली, पण ट्रेनमध्ये तिच्यावर चाकू हल्ला झाला, त्यात तिचा मृत्यू झालाय. शार्लट लाईट रेल्वे ट्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.

चाकू हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.आयरिना झारुत्स्का (Iryna Zarutska) असे २३ वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. ती पिझ्झारिया येथे काम करत होती. २२ ऑगस्ट रोजी रात्री ९.४६ वाजता Lynx Blue Line येथून ती रेल्वेत चढली. शार्लट एरिया ट्रांझिट सिस्टम (CATS)ने जारी केलेल्या व्हिडिओ फुटेजनुसार मृत तरुणी शांतपणे तिच्या फोनमध्ये व्हिडिओ पाहात बसली होती. तिच्या मागील सीटवर हल्लेखोर बसला होता. हे सर्व या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेकार्लोस ब्राउन जूनियर (वय-३४) नावाच्या गुन्हेगाराने युक्रेनच्या तरुणीची हत्या केली. डेकार्लोस ब्राउन जूनियर हा तरुणीच्या मागील सीटवर बसलेला दिसतोय, त्यावेळी त्याने आपल्याकडील चाकू काढला अन् आयरिना झारुत्स्काच्या गळ्यावर वार केला. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

हल्ला केल्यान्ंतर ब्राउन त्याचा स्वेटशर्ट काढताना दिसत आहे. त्यानंतर तो ट्रेनच्या दरवाजाजवळ उभा राहिलेला दिसत आहे. इतर प्रवासी रक्त पाहून घाबरले आहेत. आयरिना झारुत्स्का गळ्यावर हल्ला झाल्यानंतर ती गळा हातात पकडून बसली, तिचं रक्त ट्रेनच्या फरशीवर सांडत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती काही वेळानंतर जागेवरच कोसळली आणि तिचा ट्रेनमध्येच मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.तर कोर्टातील रेकॉर्डनुसार, ब्राउनचा २०११ पासून गुन्हेगारीशी संबंध आहे. सस्त्र आणि धमक्या देत दरोडा टाकणे यासरखअया गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update :पिंपरी चिंचवडमध्ये कोणाची सत्ता? वाचा आतापर्यंतचा निकाल

Heart Health: शरीरामधील रक्तप्रवाह चांगला होण्यासाठी आत्ताच करा या ५ ज्यूसचे सेवन, राहाल सुरक्षित

नवी मुंबईत भाजपची मोठी आगेकूच; गणेश नाईकांनी खोचक पोस्ट करत शिंदेंना डिवचलं|VIDEO

Vasai-Virar Result: वसई-विरारमध्ये भाजपला जोरदार झटका, वबिआची एकहाती सत्ता; साम टीव्हीचा एक्झिट पोल खरा ठरला

Blouse Design: सिंपल लूक दिसेल मॉडर्न, हे आहेत लेटेस्ट ब्लाऊजचे 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT