Jewellers Son Misbehaves With Bar Worker Saam
देश विदेश

बड्या व्यावसायिकाच्या मुलाचा प्रताप; बार वर्करला घट्ट मिठीत घेऊन Kiss केलं, घटना CCTVत कैद

Jewellers Son Misbehaves With Bar Worker: उत्तरप्रदेशातील झाशी येथून धक्कादायक बातमी समोर. सराफा व्यावसायिकेच्या मुलानं बार वर्करची काढली छेड. मिठीत घेऊन चुंबन घेतलं.

Bhagyashree Kamble

झाशीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सराफा व्यावसायिकाच्या मुलानं दारूच्या नशेत एका तरूणीची छेड काढली आहे. बार कामगार महिलेशी गैरवर्तन केले आहे. तरूणानं तिला घट्ट मिठीत घेऊन तिचे चुंबन घेतले आहे. ही संपूर्ण घटना बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सराफा व्यावसायिकाच्या मुलावर नेटकऱ्यांनी कमेंटद्वारे रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणी तक्रारीनुसार, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अलाहाबाद बँक स्क्वेअर येथील एका बार रेस्टॉरंटमध्ये घडली आहे. अमन अग्रवाल असे आरोपीचे नाव आहे. तो एका सराफा व्यावसायिकाचा मुलगा आहे. पीडित तरूणी अलाहाबाद बँक स्क्वेअर येथील बार रेस्टॉरंटमध्ये काम करते. घटनेच्या दिवशी आरोपी बार रेस्टॉरंटमध्ये गेला होता. अमन अग्रवाल भरपूर दारू प्यायला होता.

व्हायरल व्हिडिओमध्ये तरूणी रिसेप्शनजवळ उभी असल्याचं दिसत आहे. तिथे २ अन्य तरूणी आणि अमन अग्रवालही दिसत आहे. अमन पीडित तरूणीसोबत चर्चा करत असताना दिसत आहे. आधी अमन तिच्या हाताला चुंबन घेऊन पुढे जातो. नंतर पुन्हा माघारी येतो. तसेच तिला मिठीत घेऊन चुंबन घेतो.

यानंतर अमन अग्रवाल इतर २ तरूणींसोबत पुढे जातो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना नबाबाद पोलीस स्टेशन परिसरातील असल्याची माहिती आहे. सीसीटीव्ही समोर येताच पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. तसेच आरोपी अमन अग्रवालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Jio Recharge: लाखो युजर्ससाठी खुशखबर! डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...; Jioचा सर्वात भन्नाट रिचार्ज प्लान, किंम्मत किती?

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

अशोक खरातचे डर्टी चॅट्स अन् नको ते व्हिडिओ आले समोर; पोलिसांनी रिकव्हर केला मोबाईल डेटा, मोठा भांडाफोड होणार

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

SCROLL FOR NEXT