teacher punish student saam tv
देश विदेश

ही कसली शिक्षा? विद्यार्थ्यानं शाळेत नीट झाडू मारला नाही; शिक्षकानं पायाचं हाड तुटेपर्यंत मारलं

Violence in Classroom: बिहारच्या नालंदा जिल्ह्यात शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करून पाय मोडला. सूरज कुमार या विद्यार्थ्यावर वर्ग स्वच्छ न केल्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आला.

Bhagyashree Kamble

  • बिहारच्या नालंदा जिल्ह्यात शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करून पाय मोडला.

  • सूरज कुमार या विद्यार्थ्यावर वर्ग स्वच्छ न केल्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आला.

  • मारहाणीमुळे डाव्या पायाचे हाड तुटले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • जातीय शब्दांचा वापर केल्याच्या आरोपावरून गुन्हा एससी-एसटी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील लाहेरी पोलीस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेतील स्वच्छता व्यवस्थित न केल्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्याला निर्दयीपणे मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्याचा पाय मोडला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली.

मोरारपूरमधील एका शाळेत हा संतापजनक प्रकार घडला. सूरज कुमार असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. तो ब्रह्मस्थानचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्रकाश कुमार रविदास यांनी लाहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

गेल्या शुक्रवारी सूरज शाळेत गेला. शिक्षक निखिल कुमार यांनी विद्यार्थ्यांना शाळा आणि वर्गखोल्या स्वच्छ करण्याचे आदेश दिले होते. सूरजने आपला वर्ग साफ केला पण व्हरांडा न झाडल्यामुळे शिक्षक संतापले. त्यांनी सूरजसह आणखी दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत सूरज कुमार गंभीर जखमी झाला.

मारहाण इतकी जबर केली होती, की सुरजच्या डाव्या पायाचे हाड तुटले. याची माहिती कुटुंबाला कळताच त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच जखमी सुरजला तातडीने रूग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याला काही दिवस बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारी संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शाळेला घेराव घातला. तसेच आरोपी शिक्षकाला उपस्थित करण्याची मागणी केली. मात्र, शिक्षक निखिल कुमार शाळेत हजर झाले नाहीत.

पोलिसांची कारवाई

लाहेरी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून, हा गुन्हा एससी-एसटी पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रभारी रणजित कुमार रजक यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT