Shocking Incident in Bengaluru Saam Tv News
देश विदेश

पोटाची सोनोग्राफी करताना डॉक्टरचं हैवानी कृत्य, महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श अन्.. घटना कॅमेऱ्यात कैद

Shocking Incident in Bengaluru: बंगळूरूत महिला पतीसोबत स्कॅनिंगसाठी गेली. रेडिओलॉजिस्ट जयकुमार यांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. घटना कॅमेऱ्यात कैद.

Bhagyashree Kamble

कर्नाटकातील बंगळूरूमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका खासगी स्कॅनिंग सेंटरमध्ये संतापजनक प्रकार घडला आहे. वैद्यकीय स्कॅनदरम्यान रेडिओलॉजिस्टने महिलेसोबत अश्लील वर्तन केले. याचा व्हिडिओही समोर आला आहे. महिलेनं रेडिओलॉजिस्टवर अश्लील स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. महिला आपल्या पतीसोबत स्कॅनिंग सेंटरमध्ये गेली होती. यादरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली.

रिपोर्टनुसार, पीडितेनं तिच्या तक्रारीत म्हटलं की, स्कॅनदरम्यान, आरोपी जयकुमारने तिला अयोग्यरित्या स्पर्श केले. तसेच अश्लील वर्तन केले. तिनं याबाबत विरोध केला. तेव्हा आरोपी जयकुमारने तिला धमकावले. तसेच तिला गप्प करण्यासाठी अपशब्द वापरला.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला तिच्या पतीसोबत पोटाची स्कॅनिंग करण्यासाठी स्कॅनिंग सेंटरवर गेली होती. पोलिसांनी सांगितले की, तिनं हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. तसेच पोलिसांना हा व्हिडिओ दाखवून आरोपी जयकुमारविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. मात्र, जयकुमारला पोलिसांनी अटक केली नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. मात्र, त्याची विचारपूस करून त्याला सोडून दिलं. पीडितेवर सध्या बंगळूरूमधील राजीव गांधी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा हादरा; विश्वासू नेत्यानं साथ सोडली, तडकाफडकी राजीनामा

Maharashtra Live News Update: पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी घडवली अद्दल

Sunday Horoscope: पैशाची तंगी होणार दूर, ५ राशींची होणार भरभराट, वाचा रविवारचे राशीभविष्य

VIDEO : भरधाव कारनं ४-५ दुचाकींना उडवलं, ट्रॅफिक हवालदार, २ वकिलांसह ५ जखमी, CCTV मध्ये अपघाताचा थरार कैद

Chikhaldara Tourism : चिखलदऱ्याला जा अन् काश्मीरचा फिल घ्या, पाहा निसर्गरम्य ठिकाणांची यादी

SCROLL FOR NEXT