bihar accident news  Saam tv
देश विदेश

धक्कादायक! भरधाव कारने ६ जणांना उडवलं, रस्त्यावरील श्वानालाही चिरडलं

bihar accident news : भरधाव कारने ६ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

पटनाच्या दानापूरमध्ये भरधाव कारच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू

कार चालवणाऱ्याने आधी श्वानाला चिरडलं, नंतर पादचाऱ्यांनाही उडवलं

अपघातानंतर चालक वेगाने घटनास्थळावरून फरार झाला

बिहारमध्ये पटनाच्या दानापूरमध्ये ६ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. दानापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झखडी महादेव रोडवर ही घटना घडली आहे. या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

बिहारच्या दानापूरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या अपघतात ६ जणांना उडवल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातानंतर चालकाने कारचा वेगाने पळ काढला. या अपघातात वृद्धाचा चाकाखाली येऊन मृत्यू झाला. तर कार चालकाने एका श्वानाला देखील चिरडलं. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

मृत व्यक्ती ६० वर्षांचा असल्याची माहिती मिळाली आहे. कार चालक दारूच्या नशेत होता का, याविषयी माहिती मिळालेली नाही. सुरुवातीला या कार चालकाने श्वानाला चिरडलं. त्यानंतर त्याने रस्त्यावरील लोकांना उडवलं.

रस्त्यावर अपघातानंतर एकच खळबळ उडाल्याचं दिसत आहे. अपघातात जखमी झालेले लोकांनी तातडीने कारचालकाला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु चालक कारचा वेग वाढवून फरार झाला. चालकाने ५०-६० च्या वेगाने कार चालवली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. पोलिसांकडून अपघातानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अपघातानंतर कारचालकाने मरीन ड्राइव्हच्या दिशेने पळ काढला. ट्रॅफिक पोलिसांनी आधार कार्डावरून चालकाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. मात्र, अद्याप पोलिसांना चालकाचा शोध लागलेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दानापूरच्या गोला रोड टी पॉइंटजवळ एका कारने काही लोकांना उडवलं. यात अनेक जण जखमी झाले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. तर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे'.

खालील व्हिडिओतील दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अनैतिक संबंधासाठी बायकोचं हादरवणारं कृत्य, बॉयफ्रेंडच्या मदतीने भररस्त्यात गळा चिरला अन्...

Nashik Crime: ६४ वर्षीय व्यक्तीचे अश्लील चाळे, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; मालेगावनंतर मनमाड हादरलं

Sheera Recipe : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा मऊसूत तुपाचा शिरा, वाचा खास रेसिपी

Early Dinner: रोज रात्री लवकर जेवण केल्याने शरीरात होतील 'हे' बदल, आजपासूनच लावा 'ही' सवय

Maharashtra Split: महाराष्ट्र तुटणार? वेगळा विदर्भ होणार? मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले संकेत|VIDEO

SCROLL FOR NEXT