Uttar Pradesh Saam Tv
देश विदेश

Shocking: ६ मुलांचा बाप अल्पवयीन मुलीच्या प्रेमात वेडा, रेल्वे रूळाजवळ आढळले दोघांचे मृतदेह; नेमकं काय घडलं?

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने प्रेयसीसोबत आत्महत्या केली. दोघांनी विष पिऊन आत्महत्या केली. रेल्वे रुळाजवळ त्यांचे मृतदेह आढळले. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली.

Priya More

उत्तर प्रदेशच्या बागपतमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी प्रेमसंबंधाचा भयंकर शेवट झाला. सहा मुलांचा ३८ वर्षीय बाप १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रेमात वेडा झाला. दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. रेल्वे रूळाजवळ दोघेही बेशुद्धावस्थेत आढळले होते. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक घटना बरौत परिसरातील बिजरौल रेल्वे स्थानकाजवळ घडली. रविवारी सकाळी स्थानिक नागरिकांना रेल्वे रुळाजवळ दोन जण बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. दोघांच्याही तोंडातून फेस येत होता आणि त्यांची प्रकृती गंभीर होती. रेल्वे स्टेशनच्या मास्टरने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी मेरठला हलवण्यास सांगितले. पण उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, मृत मुलगी १७ वर्षांची होती आणि ती शामली जिल्ह्यात राहणारी होती. तिचा प्रियकर देशपाल (३८ वर्षे) हा देखील याच जिल्ह्यात राहत होता. देशपाल सहा मुलांचा बाप होता आणि तो त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. दोघेही एका वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होते. काम करता करता दोघांची जवळीक वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. देशपाल विवाहित असताना देखील अल्पवयीन मुलगी त्याच्या प्रेमात वेडी झाली. दोघेही एकमेकांच्या घरी येत जात होते. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांना त्यांच्या नात्याबद्दल कळाले होते.

अल्पवयीन मुलगी आणि देशपाल गेल्या ३ दिवसांपासून बेपत्ता होते. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तिचे कुटुंबीय सगळीकडे तिचा शोध घेत होते. याचदरम्यान त्यांना देशपाल आणि ती मुलगी रेल्वे रूळावर बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोघांनी आत्महत्या केली की त्यांना कुणी जबरदस्तीने विष पाजण्याचा प्रयत्न केला. या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News: धुळ्यात अपघाताचा थरार! दोन ट्रकची जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू तर ७० बकऱ्या मृत्यूमुखी

Face Care: टॅनिंगपासून ते डागांपर्यंत...; घरातील 'या' एका गोष्टीमुळे चेहऱ्यावरील सगळे प्रॉब्लम होतील दूर, मिळेल ग्लोईंग स्किन

Hormonal Changes : पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीमुळे महिलांच्या आतड्यांवर होणारे परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण माहिती

शाळेसमोर भीषण अपघात, पोलिसाच्या कारने ३ विद्यार्थ्यांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: आयुष कोमकर हत्या प्रकरणी कृष्णा आंदेकर याला 2 दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT