Shruti Vilas Kadam
टॅनिंग, डाग-धब्बे आणि त्वचेवरील समस्या दूर करण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरतो.
महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स न वापरता हा फेस पॅक सहज घरी तयार करता येतो.
१ लहान कच्चा बटाटा, १ चमचा मुल्तानी माती, १ चमचा गुलाबजल.
बटाटा धुऊन सोलून किसावा व त्याचा रस काढून घ्यावा.
या रसामध्ये मुल्तानी माती व गुलाबजल घालून पेस्ट तयार करावी.
चेहऱ्यावर ही पेस्ट लावून १५–२० मिनिटे वाळू द्यावी व नंतर स्वच्छ धुवावे.
हा पॅक त्वचेचा ग्लो वाढवतो, त्वचा स्वच्छ व तजेलदार बनवतो.