Uttar Pradesh Video  Saam Tv
देश विदेश

Shocking: रुग्णालयात कुस्तीचा आखाडा! डॉक्टर आणि आशा वर्कर्सने एकमेकांना धू-धू धुतलं; VIDEO व्हायरल

Uttar Pradesh Video: उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील रुग्णालयात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. डॉक्टर आणि आशा वर्कर्स यांनी एकमेकांना धू-धू धुतलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • बिजनौर रुग्णालयात डॉक्टर आणि आशा वर्कर्समध्ये तुफान हाणामारी झाली.

  • अल्ट्रासाऊंड आणि पैशांवरून वाद झाल्याची माहिती समोर आली.

  • डॉक्टरने मोबाईल हिसकावून फेकल्यावर हाणामारी सुरू झाली.

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये रुग्णालयामध्ये कुस्तीचा आखाडा रंगल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि आशा वर्कर्स यांच्यामध्ये तुफान राडा झाला. त्यांनी एकमेकांना धू-धू धुतलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये महिला डॉक्टर आधी आशा वर्करचा मोबाईल हिसकावून घेते आणि तो जमिनीवर फेकून देतो. त्यानंतर हाणामारीला सुरूवात होते.

ही घटना रुग्णालयात रुग्णांसमोर घडली. बराच वेळ धक्काबुक्की आणि एकमेकांना चापटी मारल्यानंतर जवळच्या लोकांनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबवली. या हाणामारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहचले असून या प्रकरणी आशा वर्करकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत.

मांडवली सैदू ग्रामपंचायतीची आशा वर्कर सरिता दोन गर्भवती महिलांना घेऊन रुग्णालयात आली. तिने आरोप केला आहे की, अनेक दिवसांपासून अल्ट्रासाऊंडची विनंती करूनही त्यांना नकार दिला जात होता. जेव्हा तिने डॉ. ज्योती बालियान यांना विचारले तेव्हा तिला २०० रुपये देण्यास सांगण्यात आले. सरिता यांनी विरोध केल्याने वाद वाढला. आशा वर्कर ज्योतीने संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शूट करण्यास सुरूवात केली. तेव्हा डॉक्टर ज्योतीने मोबाईल हिसकावून घेत फेकून दिला. मोबाईलचे दन तुकडे झाले. त्यानंतर आशा वर्कर्स भडकल्या. यावेळी आशा वर्कर्स आणि डॉक्टर यांच्यात तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या घटनेचा ४९ सेकंदांचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. यामध्ये सर्वात आधी हाणामारी दिसते नंतर डॉक्टर मोबाईल हिसकावून जमिनीवर फेकताना दिसते. त्यानंतर लगेचच आशा वर्कर डॉक्टरला कानशिलात लगावते. डॉक्टर तिला अनेक वेळा फटके मारताना व्हिडीओत दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... नक्कीचा हॉट अंदाज, फोटोशूट पाहून नेटकरी घायाळ

Team India च्या क्रिकेटपटूंना ED चा दणका! मनी लाँड्रिंग प्रकरणी मालमत्ता जप्त, कोणा-कोणावर कारवाई?

Dahanu Tourism : डहाणूला गेल्यावर 'हे' निसर्गरम्य ठिकाण पाहाच, पुन्हा पुन्हा जावंसं वाटेल

IndusInd Bank Scam: मोठी बातमी! अकाउंट बुकमध्ये गडबड; इंडसइंड बँकेत २००० कोटींचा घोटाळा

Amreli airport : विमानतळावर थरार! लँडिंगवेळी विमान रनवेवरून घसरलं, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT