Crocodile Entered Residential Area
Crocodile Entered Residential Area ANI
देश विदेश

अरे बापरे! अचानक गावात शिरल्या चक्क १० ते १५ मगरी; पुढे काय झालं? पाहा...

साम टिव्ही ब्युरो

बडोदा : जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून राज्यासह देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नदी-नाल्यांना पूर आलाय. अशातच काही ठिकाणी जलचर प्राणी पुराच्या पाण्यात वाहून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे. गुजरातमधून सुद्धा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडोदरा भागातील एका गावात अचानक १० ते १५ मगरी शिरल्या आहेत. (Shocking Crocodile Entered Residential Area in Vadodara Gujarat)

दरम्यान, गावात मगरी शिरल्याचे लक्षात येताच नागरिकांची मोठी धावपळ उडाली. अनेक नागरिक भीतीपोटी घरातच थांबून आहेत. गावात मगरी घुसरल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.

गुजरातच्या विविध नद्यांमध्ये शेकडो मगरी आहेत. राज्यात मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे मगरी निवासी भागात शिरल्या आहेत. वडोदरा येथील विश्वामित्र नदीच्या काठी लोक राहतात. जवळपास 250 मगरीही तेथे राहतात. अशा परिस्थितीत दररोज मगरी घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. (Gujrat Rain Latest Updates)

एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, वन्यजीव विभागाने अशा मगरींना पकडण्यासाठी पथके तैनात केली आहेत. या पथकाने आतापर्यंत अनेक मगरींना पकडलं आहे. मुसळधार पावसानंतर नदीला आलेल्या पुरामुळे मगरी आजूबाजूच्या परिसरात सुरक्षित ठिकाणाच्या शोधात अनेक किलोमीटर चालत राहतात. यादरम्यान ते परिसरातील ड्रेनेज लाईनच्या आतही प्रवेश करतात.

रिपोर्टनुसार, अलीकडेच जांबुवा गावातून एक मोठी मगर रस्ता ओलांडताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 8 जुलै रोजी वडोदरा येथील एका शाळेतही मगर घुसली होती. दरम्यान, तापी नदीवरील उकाई धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे नवसारी आणि वलसाडसह गुजरातमधील अनेक जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. त्यातच गावात मगरी घुसण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: नायर रुग्णालयाच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या, धक्कादायक VIDEO आला समोर

Janhvi Kapoor : परम सुंदरी; जान्हवी कपूरच्या सौंदर्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या...

Today's Marathi News Live: काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Abhishek Ghosalkar: हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सर्व CCTV फुटेज कुटुंबियांना दाखवा: हायकोर्ट

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT