Mumbai News: नायर रुग्णालयाच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या, धक्कादायक VIDEO आला समोर

Mumbai Crime News: मुंबईतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे मुंबईच्या प्रसिद्ध नायर रुग्णालयाच्या कर्मचारी निवासस्थानाच्या पंधराव्या मजल्यावरून एका तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आल आहे.
Nair Hospital Viral Video
Nair Hospital Viral VideoSaam Tv

Nair Hospital Viral Video:

>> संजय गडदे

मुंबईतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे मुंबईच्या प्रसिद्ध नायर रुग्णालयाच्या कर्मचारी निवासस्थानाच्या पंधराव्या मजल्यावरून एका तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आल आहे. पंधराव्या मजल्यावरून आत्महत्या करताच तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. रोहित किशोर गुरबानी 33 वर्ष, असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो नायर रुग्णालयात रजिस्ट्रेशन असिस्टंट म्हणून काम पाहत होता.

रोहित हा 2015 पासून नायर रुग्णालयात कर्मचारी म्हणून कामाला लागला. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास रोहितने आत्महत्या केल्याचे समजते. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nair Hospital Viral Video
JP Nadda: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गुरबानी हा 33 वर्षीय तरुण मुंबईच्या प्रसिद्ध नायर रुग्णालयात रजिस्ट्रेशन असिस्टंट म्हणून काम पाहत होता. मागील सात ते आठ वर्षापासून सिझोफेनिया या आजारावर उपचार देखील घेत होता. नुकतेच लोकसभा 2024 च्या निवडणूक कामासाठी देखील त्याची नेमणूक करण्यात आली होती.

मात्र दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास टोपाज या उंच इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून राहुलने आत्महत्या केली. राहुलने आत्महत्या केल्यामुळे नायर रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nair Hospital Viral Video
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

आत्महत्येची माहिती मिळताच रुग्णालय परिसरातील कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी नायर रुग्णालयात आणले. सायंकाळी पाच वाजून 40 मिनिटांनी त्याला रुग्णालयात आणण्यात आले. मात्र रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या आत्महत्या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून आग्रीपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, रोहितने आत्महत्या का केली, हे अद्याप संजू शकलेलं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com