Haryana Panipat Woman physical assaulted  Saam Tv
देश विदेश

'तुला तिघांसोबत शरीरसंबंध..' युट्यूबर्सकडून आळीपाळीनं लैंगिक अत्याचार, VIDEOही काढला

Panipat Woman physical assaulted: हरियाणातील पानिपतमध्ये महिलेचं अपहरण करून सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस. ४ युट्यूबर्सविरूद्ध गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

  • अपहरण करून सामूहिक बलात्कार.

  • ४ युट्यूबर्सविरूद्ध गुन्हा दाखल.

  • परिसरात खळबळ.

हरियाणाच्या पानिपतमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महिलेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एका महिलेसह चार युट्यूबर्सने हा गुन्हा केला आहे. पीडित महिलेनं सांगितलं की, तिला आधी कारमध्ये बसवण्यात आले. नंतर जंगलात नेण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केलाय.

पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत पीडित तरूणीनं सांगितलं की, 'मी लाकूड गोळा करण्यासाठी रिफायनरी रोडवरील जंगलात गेली होती. या ठिकाणी किरण नावाच्या महिला युट्यूबरशी भेट झाली. किरणसोबत इतर ३ तरूण होते. तिघांनी ओळख अमन, अश्वनी आणि मास्टर संदीप अशी करून दिली होती. चौघेही चारचाकीतून आले होते'.

'यावेळी किरणने सांगितले की, तू खूप घाणेरडे काम करतेस. तुला या तिघांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील. महिलेनं मात्र नकार दिला. पीडितेनं नकार देताच चारही आरोपींनी महिलेसोबत जबरदस्ती केली. तिला कारमध्ये बसवलं. तसेच तिला जंगलात नेलं. निर्जन ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तिच्यावर तिघांनी मिळून आळीपाळीनं लैंगिक अत्याचार केला'.

यावेळी पीडितेनं विरोध केला. आरोपींनी तिला मारहाण केली. हा सर्व प्रकार घडत असताना महिला युट्यूबर हातात काठी घेऊन कारजवळ पाळत ठेवून होती. अत्याचार होत असताना व्हिडिओही शूट करण्यात आला. शूट केलेला व्हिडिओ दाखवून महिलेला व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. यानंतर आरोपी फरार झाले. या प्रकरणी पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रातील या गावात शिवी दिल्यास आकारला जातो दंड? काय आहे नियम वाचा

Maharashtra Live News Update : कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा, मशीन आणि औषधं जप्त

Winter Skin Care : हिवाळ्यातील जादुई फेसपॅक, रोज चमकेल त्वचा

Accident: बॅरियरला धडकत कार उड्डाणपूलावरून खाली कोसळली; शबरीमालाला जाणाऱ्या ४ जणांचा जागीच मृत्यू

Lasun Chutney: रोज वरण भात खाऊन कंटाळलात? मग गरमा गरम भाकरीसोबत करा लसणाच्या स्पेशल चटणीचा बेत

SCROLL FOR NEXT