afghanistan  Saam tv
देश विदेश

Shocking : धक्कादायक! ४५ वर्षांच्या व्यक्तीने केलं ६ वर्षीय मुलीशी लग्न, कुठे घडली घटना?

afghanistan shocking News : अफगाणिस्तानात ४५ वर्षांच्या व्यक्तीने ६ वर्षीय मुलीशी लग्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर खळबळ उडालीये.

Vishal Gangurde

अफगाणिस्तानसारख्या देशात बालविवाहासारखे प्रकार काही नवीन नाहीत. अफगाणिस्तानमध्ये एका बालविवाहाने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतात ४५ वर्षीय व्यक्तीने एका सहा वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर ६ वर्षीय नवरीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या बालविवाहामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या तालिबानी राज्यात बाल विवाहाबाबत कोणतेही कायदे नाहीत. अफगाणिस्तानमध्ये लग्नाच्या वयाबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. यामुळे अफगाणिस्तानमध्ये एका ४५ वर्षीय व्यक्तीने अवघ्या ६ वर्षांच्या मुलीसोबत लग्न केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर संताप व्यक्त केल्यानंतर लग्न केल्यानंतर मुलीला वयाच्या ९ व्या वर्षी नवऱ्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.

बालविवाह प्रकरणी अफगाणिस्तानातील पोलिसांनी मुलीचे वडील आणि नवऱ्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिसांत कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने याआधी दोन लग्न केली आहेत. तिसऱ्या लग्नासाठी व्यक्तीने मुलीच्या कुटुंबीयांना पैसे दिल्याचे सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर बालविवाहाचे प्रमाण वाढलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तालिबानी शासनात बालविवाहामध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगातील सर्वात अधिक बालविवाहाचे प्रमाण अफगाणिस्तानमध्येच आहे, असा यूनिसेफच्या रिपोर्टचा दावा आहे .

अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्याने बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. बालविवाहाला सामाजिक मान्यता देखील मिळू लागली आहे. मुलींना शिक्षण आणि कामाला बंदी असल्याने अनेक कुटुंब मुलींचं लग्न लवकर लावून देत असल्याचे समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेची मुंबईत रेकी

Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये किळसवाणा प्रकार, मॉलमध्ये उंदीर खातायेत आईस्क्रीम; Video Viral

SCROLL FOR NEXT