समुद्रातील मोठ्या लाटेमुळे कपल वाहून गेले
तरुण बचावला पण तरुणी लाटांसोबत वाहून गेली
या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
भरतीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर जाणे धोकादायक असते
समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एका कपलसोबत भयंकर घटना घडली. उंच लाटांमुळे दोघेही समुद्रात वाहून गेले. सुदैवाने तरुणाला स्वत:चे प्राण वाचवण्यात यश आले. पण तरुणी समुद्राच्या लाटांमध्ये अचानक गायब झाली. ही तरूण वाहून गेली असून तिचा शोध घेतला जात आहे. या घटनेमध्ये तरुणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भरतीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर जाणं एका कपलला चांगलेच महागात पडले आहे. दोघेही समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करत होते. आपल्यासोबत काही तरी भयंकर घडेल असं त्यांना अजिबात वाटलेही नसेल. समुद्र खवळलेला असताना देखील दोघेही त्याच ठिकाणी उभे राहून रोमान्स करतात. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलला मोठी लाट ओढत समुद्रात नेते. क्षणात दोघेही दिसेनासे होतात.
तेवढ्यात तरुण लाटासोबत पाण्यातून बाहेर येताना दिसतो. पण तरुणी मात्र लाटासोबत समुद्रात जाते. हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो पण अथांग समुद्रासमोर त्याचे काहीच चालत नाही. आपल्या गर्लफ्रेंडला डोळ्यासमोर समुद्रात बुडताना पाहून या तरुणाला रडू आवरेनासे झाले असावे. या तरुण-तरुणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भरतीच्या वेळी समुद्र खवळलेला असताना देखील समुद्र किनाऱ्यावर गेल्यामुळे तरुणीला आपला जीव गमवावा लागला. या कपलचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर जाताना सावधानगिरी बाळगणं खूप गरजेचे असते. वारंवार पोलिसांकडून समुद्र किनाऱ्यावर भरतीच्या वेळी जाऊ नये असे सांगितले जाते तरी देखील अनेक जण ऐकत नाही आणि अशा भयानक घटना घडतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.